जीएसबी सेवा मंडळाचे पर्यावरणपूरक उपक्रम
मुंबई, ता. २५ : दरवर्षीप्रमाणे यंदाही किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाच्या गणेशोत्सवाकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. यंदा मंडळाकडून सामाजिक, पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
मंडळाचा महागणपती भक्तांना केवळ धार्मिक अनुभवच देत नाही, तर शिक्षणसहाय्य, अन्नदान, पर्यावरणपूरक उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक जबाबदारीही पार पाडतो. मंडळाचे अध्यक्ष अमित डी. पाई यांनी सांगितले की, दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणासाठी सहाय्य पुरवले जाते. दरवर्षी तब्बल ७५ हजारांहून अधिक पूजा-अर्चना केल्या जातात. पाच दिवसांत सुमारे १.१० लाख भाविक अन्नदान सेवेत सहभागी होतात. केळीच्या पानावर दिला जाणारा हा प्रसाद भक्तांच्या श्रद्धेचा भाग ठरतो. यंदा मंडळाने पर्यावरणपूरकतेला विशेष प्राधान्य दिले आहे. शाडू मातीपासून बनविलेली मूर्ती, नैसर्गिक रंग, प्लॅस्टिकऐवजी एलईडी स्क्रीनचा वापर आणि डिजिटल पावत्या या माध्यमातून मंडळाने ‘ग्रीन गणेशोत्सव’ साजरा करण्याचा संकल्प केला आहे. यासोबतच स्वयंचलित किऑस्क यंत्रणा व क्यूआर कोडद्वारे सेवा-बुकिंगची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तांच्या सुरक्षिततेसाठी ८७५ सुरक्षा रक्षक, शंभराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेहरे ओळखणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच ४७४.४६ कोटींचा विक्रमी विमा कवच घेण्यात आल्याचे मंडळाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.