मुंबई

घरगुती चलचित्रातून सांगणार मराठी भाषेचे महत्त्व

CD

घरगुती चलचित्रातून सांगणार मराठी भाषेचे महत्त्व
अभिषेक चिटणीस यांच्या घरच्या गणेशाची सजावट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली असून १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला. या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले; पण आजही कर्नाटक आणि गुजरातने बळकावलेले प्रांत महाराष्ट्राला परत मिळालेले नाहीत. मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या लढ्यात आता भाषेचीही लढाई समोर उभी ठाकली आहे.
महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषा दुय्यम ठरतेय, अशा वेदनेवर आधारित वास्तवदर्शी चलचित्र ‘माझ्या मराठीची गोडी’तून सादर करण्यात आले आहे. या चलचित्रातून मराठी भाषा जपण्याची गरज अधोरेखित केली आहे. मराठी मातीत जन्मलो तर मराठी म्हणूनच जगायचं आणि मराठीचं गतवैभव पुन्हा उभं करायचं, हा संदेश या सादरीकरणातून दिला जातो.
लेखन आणि निवेदन उमेश सावंत यांनी केले आहे. सजावट रवींद्र शंकर चिटणीस आणि अभिषेक रवींद्र चिटणीस यांनी केली. प्रकाश योजना कौस्तुभ प्रदीप कदम आणि अभिषेक रवींद्र चिटणीस यांनी सांभाळली तर संगीत महेश मांजरेकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आजही परवानगी; तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांचे हाल

निराधार मुलांच्या विकासासाठीची प्रयोगशाळा!

माेठी बातमी!'महिलांना लुटणाऱ्याचा एन्‍काउंटर'; सातारा पोलिसांवर पुणे जिल्ह्यातील शिक्रापुरात हल्‍ला, २२ गंभीर गुन्हे

आजचे राशिभविष्य - 31 ऑगस्ट 2025

Sunday Breakfast Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ज्वारी अन् दुधी भोपळ्याचे अप्पे, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT