मुंबई

आरपीआय कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

CD

हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप असलेल्या आरपीआय कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पक्षांतर्गत निर्माण झालेल्या राजकीय संघर्षातून, वैमनस्यातून सहकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) चार कार्यकर्त्यांची विशेष न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली. हा हल्ला राजकीय नाटक असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी गेल्या आठवड्यात विशाल दिवार, विशाल जोंजाल, विशाल गायकवाड आणि शिरीष चिखलकर यांना हत्येचा प्रयत्न आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानाअंतर्गत आरोपांमधून मुक्त केले. त्या आदेशाची प्रत गुरुवारी (ता.२७) उपलब्ध झाली. तक्रारदार नागोराव कांबळे आणि त्यांची पत्नी जयश्री कांबळे यांनी ही घटना घडल्याची साक्ष दिली, परंतु इतर प्रत्यक्षदर्शी फितूर झाले. तसेच या जोडप्याच्या साक्षीत लक्षणीय विसंगती असल्याचे न्यायाधीशांनी निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपी राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने, अतिशयोक्ती आणि खोटे आरोपात गोवण्यात आल्याचे हे नाकारता येत नाही, ही घटना हत्येच्या प्रयत्नापेक्षा राजकीय स्टंट असून त्याला गंभीर गुन्ह्याचा रंग देण्यात आला होता, जो संशयापलीकडे सिद्ध झालेला नसल्याचेही, न्यायालयाने आदेशात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Reaction on Jarange Hunger Strike: मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले..

सरोगसी करण्यासाठी किती खर्च येतो? सनी लिओनी म्हणाली- आम्ही त्या मुलीला इतके पैसे दिलेले की तिने...

Cyber Crime: गणेशोत्सवात सायबर भामट्यांचे जाळे! घरपोच प्रसाद, व्हीआयपी दर्शनाचे प्रलोभन

Latest Maharashtra News Updates : बोरिवली पश्चिमेतील दत्तानी टॉवरमधील फ्लॅटला लागली भीषण आग

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंना एकच दिवस परवानगी मिळालीय, सरकार काय करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही....''

SCROLL FOR NEXT