परभणी ते मुंबई चक्क सायकलने
मराठा आंदोलनासाठी ७२० किमीचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत; मात्र एक अवलिया परभणीवरून थेट सायकलने मुंबईला आला आहे. संदीप गव्हाणे असे या सायकलस्वाराचे नाव असून, २३ ऑगस्टला सकाळी परभणीवरून निघून गुरुवारी मध्यरात्री ते मुंबईत दाखल झाले. एकूण ७२० किमीच्या प्रवासात त्यांनी ठिकठिकाणी मराठा आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर संदीप गव्हाणे हे परभणी जिल्ह्यात सायकलवर फिरून जनजागृती करीत होते. मागच्या वेळी झालेल्या आंदोलनातही ते मुंबईला सायकलवरच आले होते. त्यांना समाजातून मोठ्या स्तरावरून पाठिंबा मिळाला. जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत मुंबईतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संदीप गव्हाणे पाटील यांनी सायकलला भगवे झेंडे लावले आहेत. त्याचबरोबर पुढील व मागीन बाजूस ‘चलो मुंबई... मराठा आरक्षण संघर्ष सायकल वारी’ असा मजकूर लिहिलेला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेल्या पाट्यादेखील आहेत.
---
असा झाला मुंबईपर्यंतचा प्रवास
परभणीवरून संदीप गव्हाणे हे मानवत, पाथरी, आष्टी, कुंभार पिंपळगावमार्गे अंतरवाली सराटीला पोहोचले. तेथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन शेवगाव, मळेगावमार्गे पैठण, अहिल्यानगर, शिक्रापूर, शिरूर, तुळापूर, आळंदी, देहू, तळेगाव, लोणावळा, वाशी, चेंबूर व आझाद मैदान मुंबई असा प्रवास त्यांनी सायकलने केला.
===
परभणी ते मुंबईच्या प्रवासात अनेक समाजबांधवांनी मदतीचा हात दिला. राहण्या-खाण्याची व्यवस्था केली. प्रत्येक टप्प्यावर स्वागतही झाले. काही ठिकाणी समाजबांधव १० किमीपर्यंत दुचाकीने सोडविण्यासाठी आले.
- संदीप गव्हाणे-पाटील, सायकलस्वार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.