पोलिसांची हायटेक रणनीती
- शहरात कडेकोट बंदोबस्तासोबत गर्दीवरील नियंत्रण, वाहतूक नियमन आणि संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी पाेलिसांनी अद्ययावत ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेआधारे (एआय) हायटेक रणनीती आखली आहे.
- शनिवारी तब्बल साडेसहा हजार सार्वजनिक तर दीड लाखांहून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन गिरगाव, दादर, जुहू, गोराई, मढसह अन्य किनारे, पवई आणि अन्य तलावांत हाेणार आहे, असे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.
- विसर्जनस्थळांसह लालबाग-परळसह शहरातील अन्य सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी फ्लॅश लाइटसह प्रतिबंधात्मक सूचना देण्याची, उद्घाेषणांची व्यवस्था या ड्रोनमध्ये असेल, असे चाैधरी म्हणाले.
२५ हजार पोलिस तैनात
- शहरात विसर्जनानिमित्त स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बल, क्यूआरटी, दंगल नियंत्रण पथक, कॉम्बॅक्ट आणि डेल्टा या सशस्त्र जवानांसह गृहरक्षक दल आणि अँटी ड्रोन युनिट तैनात असतील. साध्या वेशातील पोलिस गर्दीत कर्तव्य बजावतील. या सर्व बंदोबस्ताला शहरातील सीसीटीव्हींची जोड मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.