मुंबई

मुंबईतील खड्ड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी

CD

मुंबईतील खड्ड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी
बेस्ट बसखाली युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा जीवितहानीची घटना घडली आहे. पवई आयआयटी मार्केटजवळ आज शुक्रवारी (ता. ५) सकाळी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा बेस्ट बसखाली येऊन मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे.
विक्रोळी आगारातील वातानुकूलित बस सकाळी साडेसहाच्या सुमारास मार्ग क्रमांक ए-४२२ वांद्र्याकडे निघाली होती. ही बस आयआयटी मार्केटच्या मुख्य गेटजवळ आल्यानंतर पुढे जात असताना दुचाकी खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात घसरली. त्याच वेळी उजव्या बाजूने आलेल्या कारने कट दिला. त्यामुळे दोन्ही युवक रस्त्यावर कोसळले. यात देवांश भरत पटेल (वय २२) हा युवक बसच्या डाव्या बाजूच्या मागील टायरखाली सापडला. पोलिसांनी त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले; मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्यासोबत असलेला स्वप्नील विश्वकर्मा (२३) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पवईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. या अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT