मुंबई

पूर्व उपनगरात नाल्यांचे व पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे; •३.७४ कोटींचा करार मंजूर

CD

पुराच्या संकटावर मात
पूर्व उपनगरांमध्ये नाले, पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने पूर्व उपनगरातील एम/पूर्व विभागात महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत. देवनार पशुवधगृहातील ग्रेडिंग यार्ड परिसरात नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधण्याबरोबरच घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड ते ठाणे खाडीपर्यंत पीएमजीपी मोठ्या नाल्यालगत सहा मीटर रुंदीचा सेवा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी एकूण तीन कोटी ९४ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. ई-निविदा प्रक्रियेत एकूण पाच कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी चार कंत्राटदार पात्र ठरले. मे. अनस इन्फ्रा यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा २२.५१ टक्के कमी दर देऊन सर्वात कमी देकार सादर केला. त्यामुळे हे काम अनस इन्फ्राला देण्याची शिफारस केली आहे.

महापालिकेच्या अंदाजानुसार अनस इन्फ्राचा कराराचा खर्च तीन कोटी ९४ लाखांवर निश्चित झाला असून, कर व इतर अधिभारांसह एकूण खर्च चार कोटी ५७ लाखांहून अधिक होणार आहे. हा खर्च २०२५-२६च्या भांडवली अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीतून भागविण्यात येणार आहे.

सहा महिन्यांची मुदत
महापालिकेच्या मते, देवनार परिसरात पर्जन्य जलवाहिनी नसल्यामुळे पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होत असे. मात्र नव्या जलवाहिनीमुळे निचरा होईल तसेच पावसाळ्यातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील. पीएमजीपी नाल्याच्या स्वच्छतेसाठी आणि गाळ वाहून नेण्यासाठी सेवा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. कंत्राटदाराला हे काम सहा महिन्यांत पूर्ण करायचे असून, पावसाळा या कालावधीत धरला जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Deglur Bhukhand: कर्मचाऱ्यांसाठीचे भूखंड इतरांच्या घशात? देगलूर प्रकरणात चौकशीचे आदेश, सहकार क्षेत्रात खळबळ

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

SCROLL FOR NEXT