पीओपी अज्ञातस्थळी साठवणार
निर्माल्यापासून सेंद्रिय खत; पालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबविताना दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. पीओपी मूर्तींचे शास्त्रोक्त पुनर्प्रक्रिया आणि विसर्जनावेळी जमा झालेले निर्माल्य सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करणे यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन यंदा जमा झालेला पीओपीचा लगदा अज्ञातस्थळी साठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील विसर्जनानंतर तब्बल १,९८२ मेट्रिक टन पीओपी संकलित झाले. सुरुवातीला हा गाळ शिळफाटा-डायघर प्रकल्पावर हलवण्यात आला. मात्र स्थानिक नागरिकांनी प्रदूषण आणि आरोग्य धोक्याचा मुद्दा उपस्थित करीत तीव्र विरोध दर्शवला. परिणामी पालिकेने हा गाळ सध्या अज्ञातस्थळी संकलित केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा २९० कृत्रिम तलाव उभारले गेले. विसर्जनानंतर त्यातील गाळ संकलित करून पुनर्वापरासाठी पाठवण्याची जबाबदारी पालिकेवर होती. आतापर्यंत ४३६ वाहनांतून पीओपीची वाहतूक झाली असून, पारदर्शकतेसाठी वजन काट्याचा डेटा, फोटो-व्हिडिओ नोंद आणि दैनंदिन अहवाल बंधनकारक केला आहे. पुढील काही दिवसांत तज्ज्ञ समिती यावर प्रक्रिया करण्याचा मार्ग निश्चित करणार आहे. या नव्या उपक्रमामुळे समुद्रातील प्रदूषणावर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
...
निर्माल्यापासून सेंद्रिय खत
गणेशोत्सवात महापालिकेने ५०८ मेट्रिक टन निर्माल्य गोळा केले. यासाठी शहरभर ५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ वाहने तैनात करण्यात आली होती. हे सर्व संकलित निर्माल्य आता पालिकेच्या ३७ सेंद्रिय खत प्रकल्पांमध्ये पाठवले जात आहे. साधारणपणे एका महिन्यात त्याचे खतात रूपांतर होईल आणि ते महानगरपालिका उद्यानांमध्ये वापरासाठी उपलब्ध होईल. अनंत चतुर्दशीनंतर गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, गोराईसह सर्व ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
...
पर्यावरणपूरक पावले
पालिका प्रशासनाने घेतलेल्या या दोन्ही उपाययोजनांमुळे एकीकडे पीओपीचा शास्त्रोक्त वापर व पुनर्प्रक्रिया होणार आहे, तर दुसरीकडे निर्माल्य खताच्या स्वरूपात पुन्हा शहरातील हिरवळ वाढवण्यासाठी उपयोगात येणार आहे. पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.