मुंबई

गोराई किनाऱ्यावर पर्यटकांची बस पाण्यात

CD

गोराई किनाऱ्यावर पर्यटकांची बस पाण्यात
वाळूत फसलेल्याने भरतीमुळे तरंगली; चालकाविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः पर्यटकांना घेऊन सहलीसाठी गोराई येथे आलेली मिनीबस सोमवारी सकाळी किनाऱ्यावरील वाळूत फसली. त्याच सुमारास समुद्रास भरती आल्याने फसलेली बस पाण्यात तरंगू लागली. घटना घडली तेव्हा चालकाव्यतिरिक्त बसमध्ये कोणीही नव्हते. सुमारे तीन तासांनंतर ही बस जीवरक्षक, स्थानिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या प्रकरणी गोराई पोलिसांनी चालक राजेश गिरी (वय २७) विरोधात मनाई आदेश झुगारून बस किनाऱ्यावर नेल्याबद्दल गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरी हा धारावीचा रहिवासी असून या मिनीबस मालकाकडे चालक म्हणून नोकरी करतो. ही बस मुंबईतील काही पर्यटकांना घेऊन गोराई किनाऱ्यावर आली होती. पर्यटकांना किनाऱ्यावरील एका बंगल्यात सोडल्यानंतर गिरीने बस वाळूत नेली. वाळूत बस फसली आणि त्याच सुमारास भरती सुरू झाली. चाकांखाली पाणी येऊ लागल्याने बस आणखी रुतली. गिरीने स्थानिकांना मदतीसाठी बोलावले; मात्र काही मिनिटांतच भरतीमुळे अर्धी बस पाण्याखाली गेली आणि लाटांमध्ये तरंगू लागली. बस वाहून जाऊ नये म्हणून जीवरक्षक, स्थानिक रहिवाशांनी दोरखंड बांधून बस रोखली. पुढे भरती ओसरल्यानंतर ती किनाऱ्याबाहेर काढण्यात आली; मात्र त्यास तीन ते चार तास लागले. तोवर बस तरंगतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि किनाऱ्यावर बघ्यांची गर्दी जमा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT