मुंबई

तीन महिन्यांच्या त्रासानंतर दीड वर्षाच्या मुलाच्या फुप्फुसातून एलईडी बल्ब बाहेर काढण्यात यश

CD

दीड वर्षाच्या मुलाला नवजीवन
फुप्फुसातून एलईडी बल्ब काढण्यात जसलोक रुग्णालयाला यश

मुंबई, ता. ९ : सतत खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या अडीच वर्षांच्या मुलाच्या फुप्फुसात एलईडी बल्ब असल्याचे समोर आले. दरम्यान, जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा बल्ब बाहेर काढण्यात यश आल्याने त्या मुलाला नवजीवन मिळाले आहे.
तीन महिन्यांपासून विविध औषधोपचार करूनही हा बल्ब बाहेर काढण्यात यश आले नव्हते. दरम्यान, करण्यात आलेल्या तपासणीत हा बल्ब डाव्या ब्रॉन्कसमध्ये अडकलेला आढळला. कोल्हापुरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपी करूनही प्रयत्न निष्फळ ठरले होते. त्यामुळे त्या मुलाला मुंबईत आणण्यात आले. जसलोकमध्ये रिगिड ब्रॉन्कोस्कोपीदरम्यान अरुंद झालेला ब्रॉन्कस दिसून आला. अखेर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्या प्रभात यांनी मिनी थोराकोटोमी (४ सें.मी.ची कापणी) करून खेळण्यातील बल्ब काढण्यात यश मिळवले. या शस्त्रक्रियेला डॉ. अनुराग जैन (अ‍ॅनेस्थेसिया) यांनी सहाय्य केले.
डॉ. विमेश राजपूत म्हणाले, ‘‘हे आमच्या अनुभवातील अत्यंत दुर्मिळ प्रकरण होते. बल्ब फुप्फुसाच्या ऊतींमध्ये अडकला होता. पारंपरिक पद्धतींनी तो बाहेर काढणे अशक्य होते. त्यामुळे मिनी थोराकोटोमीद्वारे तो सुरक्षितपणे काढला.’’ ‘‘लहान मुलांमध्ये दीर्घकाळ खोकला, श्वास घेण्यास अडचण ही केवळ न्यूमोनियाची लक्षणे असतीलच असे नाही. अशा वेळी तपशीलवार तपासण्या केल्यास जीव वाचविणे शक्य होते,’’ असे डॉ. दिव्या प्रभात यांनी स्पष्ट केले.

फुप्फुसाचे दीर्घकालीन नुकसान : डॉ. मिलिंद खाडके
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खाडके म्हणाले, ‘‘लहान मुलांमध्ये बाहेरील वस्तू फुप्फुसात जाण्याची प्रकरणे अपेक्षेपेक्षा जास्त असतात. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञ उपचार न झाल्यास फुप्फुसाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. पालकांनी मुलांच्या खेळण्यांकडे अधिक दक्षतेने पाहणे आवश्यक आहे.’’

डॉक्टरांमुळे आमच्या मुलाला नवजीवन : अविनाश कदम
‘‘तीन महिने आम्ही सतत भीतीत जगत होतो. मुलाला काय झाले हेच समजत नव्हते. जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांमुळे आमच्या मुलाला नवजीवन मिळाले,’’ अशी भावना मुलाचे वडील अविनाश कदम यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT