मुंबई

आज अकरावी प्रवेशाची अखेरची संधी

CD

आज अकरावी प्रवेशाची अखेरची संधी
मुंबई, ता. ९ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर ओपन टू ऑल या विशेष फेरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. १० सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले प्रवेश घेता येतील. या मुदतीतच प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जाऊन आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
ओपन टू ऑल या विशेष फेरीमध्ये ८ सप्टेंबर रोजी कला शाखेसाठी चार हजार ४३७ आणि वाणिज्य शाखेसाठी तीन हजार ९७९ आणि विज्ञान शाखेसाठी सहा हजार ९०४ असे एकूण हजार ३२० विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अलॉटमेंट झाले होते. त्यापैकी मंगळवार (ता. ९ सप्टेंबर) पर्यंत एकूण १३ हजार ६४ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये कॅप फेरीसाठी एकूण एक हजार २९० इतके प्रवेश झाले आहेत, तर कोटा प्रवेशांमधून ९७४ इतके प्रवेश झाले आहेत.

व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश अत्यल्प
या प्रवेश फेरीमध्ये सर्वात कमी प्रवेश हे शालेय शिक्षण विभागाकडून संस्थाचालकांना दिलेल्या व्यवस्थापन आणि इतर कोट्यातील झालेले आहेत. विभागाने संस्थाचालक संघटनेच्या हितासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अनेक धोरणात्मक निर्णयांना हरताळ फासत अखेरच्या फेरीपर्यंत पहिल्यांदाच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश सुरू ठेवले आहेत. त्यासाठी केवळ संचालनालयाकडून एक साधे पत्र जारी करून हे प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश अत्यल्प असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT