लष्करी शस्त्रसाठा तेलंगणमधून हस्तगत
नौदलाच्या अग्निवीरासह दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः दक्षिण मुंबईतील नौदल वसाहतीतून चोरी झालेला लष्करी शस्त्रसाठा तेलंगणच्या आसिफाबाद येथून हस्तगत करण्यात आला. तसेच तो चोरणाऱ्या दोन आरोपींनाही बेड्या ठोकल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी बुधवारी दिली.
राकेश डुब्बला (वय २२) आणि उमेश डुब्बला (वय २५) अशी आरोपींची नावे असून, ते सख्खे भाऊ आहेत. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नुकतेच ६ सप्टेंबरच्या रात्री कफ परेड येथील पश्चिम नौदल मुख्यालय आवारातून इन्सास रायफल आणि ४० जिवंत काडतुसे चोरल्याची कबुली दिली असली तरी या चोरीमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या दोघांचा नक्षलवाद्यांशी संपर्क आहे का, या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचे समजते.
----
आरोपी अग्निवीरमध्ये कार्यरत
आरोपी मूळचे तेलंगणचे रहिवासी आहेत. यापैकी राकेश बारावी उत्तीर्ण असून, २०२३ मध्ये तो अग्निवीर म्हणून नौदलात दाखल झाला. ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राकेश कफ परेडच्या नेव्हीनगर येथे नियुक्त होता. त्याला नेव्हीनगर, नौदल मुख्यालयाबाबतची इत्थंभूत माहिती होती. सध्या कोची येथे नियुक्त असलेला राकेश शस्त्रसाठा चोरीसाठी ५ सप्टेंबरला मुंबईत आला, तर त्याचा मोठा भाऊ उमेश ६ सप्टेंबरला सकाळी मुंबईत दाखल झाला. दोघांनी नौदल वसाहतीची रेकी केली आणि चोरी केल्याचे उघड झाले.
---
गुप्तचर यंत्रणेचा दाखला
राकेशने गणवेशात नौदल वसाहतीच्या प्रवेशद्वारावर पोचला. सध्या गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला असून, याजागी अनुभवी व्यक्ती तैनात असावा, यादृष्टीने आपल्याला येथे नियुक्त केल्याचे त्याने पहारा देणाऱ्या जवानास सांगितले. ओळखपत्र दाखवत त्या जवानास घरी पाठवून त्याच्याकडील रायफल, काडतुसे गोणीत भरून भिंतीपलीकडे टाकली. उमेशने ती उचलली. थोड्या वेळाने राकेशही तेथून बाहेर पडला आणि दोघांनी कुर्ला, पुणे असा प्रवास करीत तेलंगण गाठले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.