मुंबई

समुद्रकिनाऱ्यावरील प्रोमेनेड पाडण्याचे आदेश

CD

समुद्रकिनाऱ्यावरील प्रोमेनेड पाडण्याचे आदेश
अक्सा येथे किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचा हरित लवादाचा निष्कर्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१६ : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मढ आयलंडमधील अक्सा बीचवर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने (एमएमबी) उभारलेला प्रोमेनेड बेकायदेशीर असल्याचा निकाल देत तो दोन महिन्यांच्या आत पाडण्याचे आदेश मंगळवारी (ता.१६) दिले. लवादाने किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष नोंदवला असून, निसर्गात असलेल्या वाळूच्या किनाऱ्यावर काँक्रीट ओतून उभारलेल्या या संरचनेमुळे किनाऱ्याच्या नैसर्गिक प्रवाहाला व जैवविविधतेला नुकसान होण्याची गंभीर शक्यता असल्याचे म्हटले आहे. तथापि, लवादाने समुद्रकिनाऱ्याच्या धूप व क्षय रोखण्यासाठी तिथे आखण्यात आलेले मोठे दगड तिथेच राहू देण्याची परवानगी दिली आहे.

हरित लवादाच्या निर्णयात म्हटले आहे की, ‘प्रोमेनेडसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतलेल्या नाहीत आणि सीआरझेड नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. यामुळे या बांधकामाला कायदेशीर आधार नसल्याचे लवादाने म्हटले आहे. पर्यावरण नियमन रचनेनुसार समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या कोणत्याही अशा प्रकारच्या बदलासाठी संबंधित संस्थेने योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि मॉनिटरिंग प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, असा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.

पर्यावरणप्रेमींकडून स्वागत
पर्यावरण कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी सांगितले की, ‘मुंबईतील जवळजवळ प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर अशाच प्रकारचे अवैध बांधकाम दिसतात. वाळूऐवजी सिमेंट आणि काँक्रीटचा वापर केवळ एक ‘दृश्य सुधारणा’ असते; परंतु याचा परिणाम दीर्घकालीन आणि तत्काळ नकारात्मक असतो. हरित लवादाने योग्य ते पाऊल उचलले आहे. गिरगाव चौपाटी, जुहू, वर्सोवा आणि इतर ठिकाणी अशा बांधकामांचे अनेक उदाहरणे आहेत. नैसर्गिक वाळूचे संरक्षण, भरती-ओहोटीचा अभ्यास, आणि समुद्राच्या संवेदनशील भागातील बांधकाम हे सर्व सीआरझेड मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावे लागतात; नाहीतर किनारपट्टीचा क्षय आणि समुद्रतटावरच्या जैवविविध्येसाठी धोका वाढतो. हरित लवादाचा आदेश हा या दृष्टीने महत्त्वाचा इशारा ठरतो.’


समुद्रकिनारे म्हणजे समुद्र आणि वाळू नैसर्गिकरीत्या हलू शकतील अशी ठिकाणे आहेत. त्यांना सिमेंटच्या प्रोमेनेडमध्ये अडकविले जाऊ नये. नैसर्गिक वाळूमय किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी हरित लवादाने दिलेल्या या आदेशाचे आम्ही स्वागत करतो.
- झोरु भाथेना, पर्यावरणप्रेमी
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT