दहिसर आगप्रकरणी
विकसकासह तिघांवर गुन्हे
घटनेवेळी अग्निरोधक यंत्रणा बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः दहिसर येथील इमारतीला लागलेल्या आगीत झालेल्या जीवित आणि वित्तहानीस जबाबदार धरत पोलिसांनी विकसक एन. रोज डेव्हलपर्स कंपनीचे संचालक, कंत्राटदार आणि पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला. मृतांचे नातेवाईक महेश पटेल यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी नुकतीच ही कारवाई केली. या घटनेत तिघांचा मृत्यू आणि २२ जण जखमी झाले होते.
दहिसर पूर्वेच्या शांतीनगर झोपडपट्टीचा झोपु योजनेअंतर्गत एन. रोज या कंपनीने पुनर्विकास केला. १७ माळे बांधून पूर्ण होताच विकसकाने एप्रिल महिन्यात पात्र गाळेधारकांना सदनिका ताब्यात दिल्या; मात्र ७ सप्टेंबर रोजी इमारतीच्या तळघरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. धुराचे लोट डक्टमधून संपूर्ण इमारतीत पसरले. घटनेवेळी विकसकाने इमारतीत उभारलेली फायर अलार्म यंत्रणा बंद होती. त्यामुळे बहुतांश रहिवाशांना आग लागल्याचे समजण्यास विलंब झाला. तोवर धुराने संपूर्ण इमारत कवेत घेतली. तसेच आग विझवणारी अग्निरोधक यंत्रणा सुरू न झाल्याने आग अधिकच पसरली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट बंद पडली. त्यामुळे इमारतीतून बाहेर पडण्यासाठी रहिवाशांनी जिन्याचा वापर केला. त्यामुळे अधिकाधिक रहिवासी आग आणि धुराच्या जाळ्यात अडकल्याचे पटेल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पटेल यांची मावशी मधू पटेल आणि भाची व दिव्यांग भाची प्रिया वाघरी जिन्यावरून खाली उतरताना घसरून पडल्या. दोघी धूर, आगीत होरपळल्या. त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.