अटलांटा इलेक्ट्रिकल आयपीओ ७१८ ते ७५४ रुपये किंमतपट्टा
मुंबई, ता. १७ : वेगवेगळ्या प्रकारचे रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) बनवणारी कंपनी अटलांटा इलेक्ट्रिकलचा ६८७ कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात येत असून, त्यासाठी ७१८ ते ७५४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान गुंतवणूक करता येईल. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील कंपनीचा महसूल १,२४४ कोटी रुपये आहे. २०२३ मध्ये तो ८७३ कोटी रुपये होता. त्यांच्या महसुलातील वार्षिक वाढ चक्रवाढदराने १९ टक्के आहे. कंपनीकडे सध्या १,६४२ कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत. कंपनीतर्फे सौरऊर्जा आणि पवनऊर्जा यांच्यासाठी आवश्यक असलेले ट्रान्स्फॉर्मर, इन्व्हर्टर ड्युटी ट्रान्स्फॉर्मर, ऑटो ट्रान्स्फॉर्मर, फर्नेस ट्रान्स्फॉर्मर, जनरेटर ट्रान्स्फॉर्मर, स्पेशल ड्युटी ट्रान्स्फॉर्मर आदी बनवले जातात. अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आदी मोठ्या कंपन्या अटलांटाचे ग्राहक आहेत. नुकतेच कंपनीने समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर काम करू शकणारे ६६ केव्हीचे ट्रान्स्फॉर्मर लेह-लडाख येथे पाठवले असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नील पटेल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.