चार कोटींचे दागिने
चोरणाऱ्यांना अटक
मुंबई : परळ येथील सराफा दुकानातून तब्बल चार काेटी सात लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या नोकरासह तिघांना भोईवाडा पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. जितू चौधरी असे नाेकराचे नाव आहे. ८ सप्टेंबरला त्याने हा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तांत्रिक तपासाआधारे जितूचा राजस्थान येथील नेमका ठावठिकाणा शोधून त्यास बेड्या ठोकल्या. या चोरीत सहभागी असलेल्या दोन मित्रांनाही अटक करण्यात आली. कमलेश चौधरी, भारतकुमार चौधरी, अशी त्यांची नावे आहेत. अटक आरोपींकडून चोरीचा ७० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.