मुंबई

श्रीसिद्धिविनायक मंदिरात सोन्याच्या अलंकारांचा लिलाव

CD

श्रीसिद्धिविनायक मंदिरात सोन्याच्या अलंकारांचा लिलाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामार्फत भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी (ता. २) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मंदिराच्या आतील परिसरात हा लिलाव होणार आहे.
लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार हे सोन्या, चांदीचे आहेत. यात गणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार आदींचा समावेश आहे. लिलावाच्या दिवशी हे सर्व अलंकार मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. ही संपूर्ण प्रक्रिया शासन नियमांनुसार होणार असल्याचे मंदिर न्यासाने स्पष्ट केले आहे.
न्यासाच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी सांगितले की, श्रीचरणी अर्पण झालेल्या अलंकारांचा उपयोग भक्तांच्या कल्याणासाठी व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. लिलावास येणाऱ्या सर्व भक्तांना आम्ही मनःपूर्वक आमंत्रित करतो. ही परंपरा भक्तिभाव वाढवणारी असून, त्यातून मिळणारी रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी वापरली जाईल, असे त्‍यांनी सांगितले.
चांदीच्या नाण्यांच्या विक्रीसह लिलावाशी संबंधित सर्व अधिकार न्यासाकडेच राखीव असतील. भक्तांनी मोठ्या संख्येने या लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीसिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT