मुंबई

मालकाचे ४५ लाख चोरणाऱ्यांना अटक

CD

मालकाचे ४५ लाख चोरणाऱ्यांना अटक
दोघांना बिहारमधून घेतले ताब्यात

मुंबई, ता. २९ ः मालकाचे ४५ लाख रुपये घेऊन पसार झालेल्या दोन तरुणांना गोवंडी पोलिसांनी आठवडाभर पाठलाग करून बिहारच्या समस्तीपूर येथील दुर्गम भागातून अटक केली. विशेष म्हणजे अटक आरोपींकडून ३६.३५ लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिस पथकाला यश आले.
ही रोकड व्यावसायिक तेजप्रकाश डांगी यांची होती. ते वडाळ्याच्या भक्ती पार्क येथे राहतात. १९ सप्टेंबरला ही रोकड त्यांनी आपल्या वाहनात ठेवली होती. त्यांची नजर चुकवून वाहनचालक नितेश महतो याने आपल्या साथीदाराच्या मदतीने ती चोरली होती. डांगी यांनी याबाबत तक्रार देताच गोवंडी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. दोन पथके उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रवाना झाली. बिहारच्या समस्तीपूर येथील दुर्गम भागात दोघे दडल्याची नेमकी माहिती प्राप्त होताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

Rajendra Bharud Action Kolhapur : कोल्हापूर महापालिकेचे 'ऑपरेशन बुलडोजर', १४३ बांधकामांवर कारवाई होणार; आयुक्त राजेंद्र भारुडांचे आदेश

Pune Chemical gas leak: अनर्थ टळला! पुण्यातील केमिकल कंपनीत गॅस गळती; १४ नागरिकांना रुग्णालयात हलवलं

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे जमीन हादरली! भूकंपाचं केंद्र 150 किलोमीटर खोल; किती होती तीव्रता?

SCROLL FOR NEXT