मुंबई

निविदा प्रक्रियेत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

CD

निविदा प्रक्रियेत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचे आयुक्तांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत सातत्याने केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून सावंत यांनी ही गंभीर बाब मांडली आहे.

भांडुप येथील २,००० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पांजरा पूर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदेत बोलीपूर्वी बैठकीनंतर निकषांमध्ये बदल करून पात्रतेच्या अटी अधिक कठोर करण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील त्यांच्या तक्रारींना अद्याप उत्तर मिळालेले नाही. १६ जुलै व ९ सप्टेंबर रोजी त्यांनी याच संदर्भात दोन वेळा तक्रार केली होती, असेही सावंत यांनी नमूद केले आहे. सध्या सुरू असलेल्या मिठी नदी पॅकेज ३ प्रकल्पाच्या निविदेबाबत गंभीर आक्षेप सावंत यांनी नोंदवले आहेत. या प्रकल्पात पूर नियंत्रणासाठी मोठे पंपिंग स्टेशन बसवणे, सांडपाणी वळवणे व नदीकाठचा परिसर विकसित करण्याचे काम अपेक्षित आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शुद्धिपत्रकात पंप उत्पादक कंपन्यांसाठी सरासरी वार्षिक उलाढाल मर्यादा ५० कोटींवरून तब्बल २१० कोटी करण्यात आली असून, तांत्रिक अनुभव निकषही बदलण्यात आले आहेत. हे बदल निविदा प्रसिद्धीनंतर आणि प्री-बिड टप्प्यानंतर करण्यात आले असल्याने ते सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

..
सक्षम उत्पादक स्पर्धेतून बाहेर
‘पंप उत्पादक हा कंत्राटदाराला पुरवठा करणारा असतो; संपूर्ण कराराची अंमलबजावणी किंवा वित्तपुरवठा करण्याची जबाबदारी त्याची नसते. अशा परिस्थितीत उत्पादकांवर अन्यायकारक आणि कठोर निकष लादणे हे मूळ कराराच्या स्वरूपाशी विसंगत आहे. त्यामुळे अनेक सक्षम उत्पादक स्पर्धेतून बाहेर टाकले जातील, ज्यामुळे स्पर्धा कमी होऊन प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे,’ असे सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT