मुंबई

चक्रीवादळ ‘शक्ती’चा मुंबईला धोका नाही

CD

चक्रीवादळ ‘शक्ती’चा मुंबईला धोका नाही
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावरील शहरांमध्ये चिंता वाढली आहे; मात्र या वादळाचा मुंबई किंवा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शक्ती या वादळामुळे मुंबईला कोणताही धोका नाही,’ अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी शनिवारी (ता. ४) दिली.

हवामान विभागानुसार, या वादळाची सध्याची गती १०० किमी प्रतितास असून, या वादळाची गती वाढण्याची शक्यता आहे. हे वादळ अद्याप किनाऱ्यापासून दूर असले तरी समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना उच्च ते मध्यम अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत वारे ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता असून, समुद्रकिनाऱ्याजवळ हवामानात अचानक बदल होऊ शकतो. दरम्यान, अंतर्गत भागात विशेषतः मराठवाडा व पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवू शकते. मुंबई व ठाण्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी मोठ्या पावसाचा धोका नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, किनारी भागांमध्ये नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

SCROLL FOR NEXT