मुंबई

मुंबईत सर्वाधिक आणि कमी लोकसंख्या असलेले १० मतदारसंघ

CD

मुंबईत सर्वाधिक आणि कमी लोकसंख्या असलेले १० मतदारसंघ
वॉर्ड क्रमांक २२४ मध्ये सर्वाधिक, ५१ मध्ये सर्वात कमी लोकसंख्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना निश्चित झाली आहे. त्‍यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. या अंतिम प्रभागरचनेसह महापालिकेने नुकतीच २२७ वॉर्डांनुसार लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली असून, त्यातून शहरातील मतदारसंघांतील लोकसंख्येतील मोठा असमतोल स्पष्ट झाला आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेला वॉर्ड क्रमांक २२४ मध्ये तब्बल ६४,२४५ लोकसंख्या नोंदवली गेली आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या ४५,४६३ इतकी असलेला वॉर्ड क्रमांक ५१ आहे. या दोन्ही वॉर्डांमध्ये जवळपास १९ हजार लोकसंख्येचा फरक असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या या नव्या आकडेवारीनुसार, काही वॉर्डांमध्ये ६० हजारांहून अधिक लोकसंख्या असून, काही ठिकाणी ती ४५ ते ४७ हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या असमतोलाचा थेट परिणाम मतदारसंख्येवर आणि मताधिक्याच्या आकडेवारीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदारसंख्या अद्याप अंतिम घोषित झालेली नसली, तरी लोकसंख्येच्या या आकडेवारीवरून काही वॉर्डांमध्ये मतदानाचे प्रमाण जास्त, तर काही ठिकाणी कमी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आह, शिवाय या सर्वाधिक व कमी लोकसंख्या असलेल्या वॉर्डांमध्ये कोणत्या जाती, धर्म आणि राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे, यावरही निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.

सर्वाधिक लोकसंख्या असलेले १० वॉर्ड
क्र. वॉर्ड क्र. लोकसंख्या
१ २२४ , ६४,२४५
२ १६, ६३,२४१
३ २२३, ६३,०४५
४ १३२, ६२,९९२
५ २२६ , ६२,९७८
६ २२५, ६२,३४१
७ १३१, ६१,८६२
८ १०४ , ६१,७०९
९ १५, ६१,६८५
१० १५५ , ६१,५३०
...........
सर्वात कमी लोकसंख्या असलेले १० वॉर्ड
क्र. वार्ड क्रमांक लोकसंख्या
१ ५१ -- ४५,४६३
२ ५४ - ४५,८४५
३ २६ -- ४६,०९९
४ १२१- ४६,१८६
५ २७ - ४६,६६१
६ १३ - ४६,७८४
७ ५३ - ४७,०३९
८ १२ - ४७,३५२
९ १२२ - ४७,७२६
१० १८९ - ४७,८१४
.......................
वॉर्डांतील स्पर्धा अधिक तीव्र होणार
या आकडेवारीवरून लोकसंख्या जास्त असलेल्या वॉर्डांमध्ये मतदारसंख्याही जास्त असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अशा वॉर्डांतील स्पर्धा अधिक तीव्र होऊ शकते. उलट, कमी लोकसंख्या असलेल्या वॉर्डांत स्थानिक घटक, व्यक्तीगत संपर्क आणि पक्षनिष्ठा या गोष्टी निर्णायक ठरू शकतात. निवडणूक आयोगाने जाहीर करायच्या आरक्षण सोडतीनंतर आणि अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरच या लोकसंख्येच्या असमतोलाचा प्रत्यक्ष राजकीय परिणाम किती होतो, हे समोर येईल.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

SCROLL FOR NEXT