मुंबई

पाच हजार मेगावॉट वीज प्रकल्पांसाठी स्वतंत्र कंपनी

CD

पाच हजार मेगावॉट वीज प्रकल्पांसाठी स्वतंत्र कंपनी
‘महानिर्मिती’ आणि ‘सतलज जलविद्युत’ची भागीदार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः राज्यात तब्बल पाच हजार मेगावॉटचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी महानिर्मिती आणि मे. सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या कंपनीत महानिर्मितीचे ४९ टक्के तर सतलजचे ५१ टक्के भागभांडवल असणार आहे. स्वतंत्र कंपनीमुळे सौर, पवन आणि लघु जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चालना मिळणार आहे.


केंद्र शासनाने २०७०पर्यंत नेट झीरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्याने २०३०पर्यंत ५० टक्के ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जास्रोताच्या माध्यमातून उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा भाग म्हणून महानिर्मिती कंपनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहभागी होत आहे. त्यानुसार उदंचन जलविद्युत प्रकल्प, तरंगते सौरऊर्जा प्रकल्प व इतर नवीकरणीय ऊर्जानिर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी मे. सतलज जलविद्युत निगम लिमिटेडसोबत संयुक्त व्यावसायिक कंपनी स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीद्वारे पहिल्या टप्प्यात घाटघर टप्पा-२ उदंचन जलविद्युत प्रकल्प-१२५ मेगावॉट, इराई तरंगता सौरऊर्जा प्रकल्प-१०५ मेगावॉट आणि निम्न वर्धा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प ५०५ मेगावॉट असे एकूण ७३५ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प विकसित करण्यात येतील. उर्वरित प्रकल्पांचे विकसन तात्कालिक परिस्थितीनुरूप टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्याची हरित ऊर्जा निर्मिती क्षमता वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT