मुंबई

ट्रम्प टॅरिफचा दिवाळी फराळाला फटका

CD

ट्रम्प टॅरिफचा दिवाळी फराळाला फटका
परदेशातून मागणीत घट; महागाईनेही खिशाला कात्री
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः भारतातून परदेशातही फराळाला माेठी मागणी असते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे त्याचा फटका फराळ व्‍यवसायालाही बसत आहे. भारतातून अमेरिकेत तीन किलो फराळ मागवण्यासाठी कुरियर आणि जीएसटीसह ७,५०० रुपये माेजावे लागतात. त्यावर आणखी ५० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागणार असल्याने हा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे फराळाच्या ऑर्डर घटल्याचे दिसून येते.

यंदा त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी फराळाची दुकाने तसेच बचत गटांचे स्टॉल सजले आहेत. महागाईमुळे यंदा फराळाच्या किमतीही १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहेत. त्यातच ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेत मागवल्या जाणाऱ्या फराळाच्या ऑर्डर घटल्या आहेत. ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. साखर, रवा, बेसन, कच्चा चिवडा, बेसन, मैदा आदी वस्तू घरी नेऊन फराळ बनवण्याऐवजी नोकरदारांकडून तयार फराळ खरेदीवर भर दिला जात आहे; मात्र महागाईमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फराळाच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

----
फराळ पाठवण्याचा दर (तीन किलो)
अमेरिका - ७,५०० रुपये
इंग्लंड, सिंगापूर, दुबई - ४,८०० रुपये
ऑस्ट्रेलियन, कॅनडा, कोरिया - ८,५०० रुपये
भारतात कुठेही - ३,२०० रुपये
---
तिखट, कमी साखरेच्या फराळाला मागणी
ग्राहकांकडून तयार फराळामध्ये कमी साखरेच्या आणि तिखट पदार्थांना पसंती मिळत आहे. तिखट शेव, चिवडा, चकली, लसूण शेव, कोन बाकरवडी आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. तेलकट फराळाच्या खरेदीबाबतही ग्राहक विचार करीत असल्याचे जाईजुई महिला बचत गटाच्या चालक सविता कचरे यांनी सांगितले.
--
आम्ही अमेरिकेसह वेगवेगळ्या देशांत दिवाळी फराळ पाठवण्याच्या ऑर्डर घेतो. दरवर्षी त्यास चांगला प्रतिसाद मिळतो. यंदा मात्र अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याने ग्राहकांकडून कमी ऑर्डर नोंदवल्या जात आहे.
- जाई चांदोरकर, चांदोरकर स्वीट्स, दादर
---
यंदा तयार फराळाच्या किमतीत १०-१५ टक्क्यांची वाढ झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत मागणी चांगली आहे. ग्राहक चांगल्या पदार्थांसाठी जादा पैसे मोजताना मागेपुढे बघत नाहीत.
- कुणाल टकले, टकले बंधू स्वीट्स, ग्राहक पेठ, दादर
-----
तयार फराळाच्या किमती (प्रति किलो)
करंजी - ८८० रुपये
बेसन लाडू - ९६० रुपये
भाजणी चकली - ५२०-६०० रुपये
शंकरपाळी - ४००- ४६० रुपये
काजी चिवडा - ४४० रुपये
मका चिवडा - ३२० रुपये
बटाटा चिवडा - ४६० रुपये
तिखट शेव - ४०० रुपये
लसूण शेव - ४०० रुपये
बाकरवडी - ४२० रुपये
काजू पतीसा - ५२० रुपये
खोबरा/साठ्याची करंजी - ३५ रुपये नग
अनारसे - ३०-३२ रुपये नग
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT