मुंबई

सहार मेट्रो स्‍थानकाबाहेर बेकायदा पार्किंग

CD

सहार मेट्रो स्‍थानकाबाहेर बेकायदा पार्किंग
प्रवाशांची तक्रार; कारवाई करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मेट्रो-३ (एक्वा लाइन) मार्गावरील अनेक प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंगमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सहार मेट्रो स्थानक परिसरात खासगी गाड्या, डम्पर आणि टॅक्सी उभ्या राहिल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
वॉचडॉग फाउंडेशनने याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, या वाहनांमुळे प्रवाशांना बाहेर पडताना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाही ड्रॉप झोनपर्यंत पोहोचणे कठीण जात आहे. स्‍थानकाची रचना मुक्त प्रवेश आणि सुकर वाहतुकीसाठी करण्यात आली असताना बेकायदा पार्किंगमुळे त्याचा उद्देशच फोल ठरत आहे.
त्यांनी एमएमआरसीएल, वाहतूक पोलिस आणि महापालिका यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. रेल्‍वेस्‍थानकाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवावे, १५ ते २० मीटर परिसरात नो पार्किंग झोन तयार करावा, गर्दीच्या वेळेत सुरक्षा रक्षक किंवा वाहतूक मार्शल तैनात करावेत, वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त घालून दंडात्मक कारवाई करावी, अशा काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. मेट्रो प्रवास सोयीचा असला तरी बाहेर येताना या गोंधळामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT