मुंबई

विद्यार्थ्यांकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्प स्थळाचा अभ्यास

CD

विद्यार्थ्यांकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्प स्थळाचा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बहुतांश मार्ग भुयारी आहे. त्याच्या खोदकामासाठी ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी कामाचा उत्कृष्ट नमुना असल्याने त्याचा अभ्यास करण्यासाठी गुजरातमधील पारुल विद्यापीठाच्या ३० हून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच विक्रोळी येथील प्रकल्प स्थळाला भेट देत पाहणी केली.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (बुलेट ट्रेन) सी-२ पॅकेजमध्ये गुंतागुंतीचे काम असून, ते ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून यशस्वीपणे पार पाडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या कामातील आव्हाने जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट देत तेथील अभियंत्यांशी संवाद साधून प्रकल्पातील तांत्रिक व व्यवस्थापकीय गुंतागुंतीची माहिती जाणून घेतली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बांधकामातील आव्हाने, कार्यपद्धती आणि देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे कार्यकारी उपाध्यक्ष संदीप देसाई, मुख्य जोखीम व्यवस्थापन अधिकारी अरुण देवरे, प्रकल्प संचालक सुनील त्यागी यांच्याशी चर्चा केली. या वेळी विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी परिवहन प्रकल्पाविषयी प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT