मुंबई

मुंबईतील वायू प्रदूषणावर पालिकेची कार्यशाळा

CD

मुंबईतील वायू प्रदूषणावर
पालिकेची कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने आता बांधकाम स्थळांवर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणि डब्ल्यूआरआय इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ‘बांधकाम स्थळांवर वायू प्रदूषण शमन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले हाेते.

या उपक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅरडको, क्रेडाई-एमसीएचआय, आयएसीसी आणि पिटा यांचे सहकार्य मिळाले. या कार्यशाळेत १०८ बांधकाम व्यावसायिक, विकसक, अभियंते आणि प्रकल्प व्यवस्थापक सहभागी झाले.
महापालिका उपायुक्त (पर्यावरण) अविनाश काटे म्हणाले, ‘मुंबईत वेगाने होणाऱ्या विकासासोबतच बांधकामातील धूळ व उत्सर्जन हे प्रदूषणाचे प्रमुख घटक ठरत आहेत. स्थळांवर महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास प्रदूषण कमी होईल आणि आरोग्यदायी वातावरण तयार होईल.’ डब्ल्यूआरआय इंडियाचे संदीप नारंग यांनी बांधकामातील प्रदूषणाचे स्राेत आणि त्यावर नियंत्रणासाठी उपाय यावर मार्गदर्शन केले.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT