मुंबई

भामट्यांना चालू खात्‍यांची रसद

CD

भामट्यांना चालू खात्‍यांची रसद
सायबर गुन्हेविश्वात टोळ्या सक्रिय; कागदोपत्री व्यवसाय दाखवून बोगस कंपन्या सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः सायबर गुन्हेविश्वात चालू खाती (करंट अकाउंट्स) पुरवणाऱ्या व्यक्ती किंवा टोळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बचत खात्यांच्या तुलनेत तिप्पट मोबदला, कमिशन मिळत असल्याने भामट्यांना खात्यांची रसद पुरवणाऱ्या टोळ्यांनी निव्वळ कागदोपत्री व्यवसाय दाखवून बोगस कंपन्या सुरू करण्याचा सपाटा लावल्याचे तपासात पुढे आल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले.
अलीकडे भामट्यांकडून चालू खात्यांची मागणी वाढू लागली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी या टोळ्यांनी अनोखी पद्धत अवलंबली आहे. एखाद्या व्यक्तीला कमिशनचे आमिष दाखवून त्याच्याकरवी कागदोपत्री चार ते पाच कंपन्या सुरू करून घेतल्या जातात. त्याआधारे करंट खाती उघडली जातात.

बँक खात्यांचा गैरवापर असा...
सायबर फसवणुकीच्या तऱ्हा निरनिराळ्या असल्या तरी त्यातून उकळली जाणारी कोट्यवधींची रक्कम पोलिस यंत्रणांकडून कारवाई होण्याआधी सुरक्षितपणे हाती घेण्यासाठी भामट्यांना असंख्य बँक खात्यांची आवश्यकता असते. पोलिसांना वेळीच फसवणुकीची माहिती मिळाल्यास बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित खाती गोठवली जातात. तसे होऊ नये, यासाठी भामटे फसवणुकीची रक्कम ठरावीक खात्यांवर येताच त्यातील थोडी थोडी रक्कम पुढील खात्यांवर पाठवतात. या रकमेच्या प्रमाणानुसार खात्यांची संख्या आणि खात्यांचे स्तर वाढतात.

खाती कशी उपलब्ध होतात?
सायबर पोलिसांनुसार बचत खात्यांसाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मुंबईसारख्या महानगरांमध्ये स्थायिक बेरोजगार तरुण आणि मजुरीसाठी परराज्यातून येणारे अशिक्षित मनुष्यबळाचे प्रमाण सर्वाधिक असते. या तरुणांना बसल्या जागी पैसे कमावण्याचे आमिष दाखवून किंवा कोणतेही निमित्त पुढे करून त्यांचे बँक खाते सुरू केले जाते. या खात्याचे नेट बँकिंग, पासबुक, चेकबुक, डेबिट कार्डचे वेलकम किटद्वारे खात्याचे नियंत्रण स्वतःकडे घेतात.

कमिशन असे...
भामट्यांकडून बचत खात्यासाठी प्रत्येकी २० ते २५ तर चालू खात्यासाठी ५० ते ६० हजार रुपये मोबदला मिळतो. याशिवाय या खात्यांवर जितकी रक्कम जमा होईल त्याच्या दोन ते १० टक्के कमिशन संबंधित व्यक्तीला दिले जाते. तसेच ही रक्कम खात्यावर काही काळ ठेवण्यासाठी आणखी पैसे दिले जातात.

मागील काळात घडलेल्‍या घटना
* मुंबईतील ७२ वर्षीय व्यक्तीस आभासी अटकेत ठेवून उकळलेले ५८ कोटी रुपये तब्बल ६ हजार ५०० खात्यांवर वळवण्यात आले. यात बँक खातेदारांचे १३ स्तर (लेअर) वापरण्यात आले, अशी माहिती सायबर महाराष्ट्रच्या तपासातून पुढे आली.
* गुन्हे शाखेच्या कक्ष-२ने अलीकडेच बँक खाती सुरू करून ती भामट्यांना विकणारी टोळी उद्‌ध्वस्‍त केली. विशेष म्हणजे या टोळीने अवघ्या काही कालावधीत तब्बल ९५० खाती सायबर भामट्यांना विकली होती. त्यातील १८१ खात्यांचा वापर भामट्यांनी केला. या खात्यांवर फसवणुकीतील ६० कोटी इतकी रक्कम वळती झाली. ही टोळी कांदिवलीच्या व्यावसायिक संकुलात लॉजिस्टिक्स आणि कन्सल्टन्सीआड हा गुन्हा करीत होती.
* फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे दक्षिण मुंबईतील व्यावसायिकास चार कोटींना फसवणाऱ्या भाविक पेठाना या तरुणास अटक केली. त्याने त्याच्या सहकाऱ्यासोबत कोलकाता येथे आयटी कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीच्या करंट खात्यावर फसवणुकीतील दीड कोटी रुपये वळते करण्यात आले होते. प्रत्यक्षात ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून बंद आहे.

या प्रकरणांमध्ये बँकांचाही काही अंशी दोष आहे. खात्यांच्या केवायसी, बायोमेट्रिक पडताळणीतील त्रुटींमुळे अशी खाती तयार होतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून अशी खाती शोधता येऊ शकतात आणि केवायसी प्रक्रियाही अधिक भक्कमपणे राबवता येते. आपल्याकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. महाराष्ट्र सायबर लवकरच राज्यातील सर्व बँकांना नवे खाते उघडताना कोणती मानक कार्यपद्धती पाळावी, याबाबत परिपत्रक जारी करेल.
- यशस्वी यादव,
अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र सायबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT