सफाई कामगारांना महापालिकेचा ‘आश्रय’
१२ हजार घरे बांधणार; ८५२ कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सफाई कामगार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी महापालिका ‘आश्रय योजना’ राबवणार आहे. या याेजनेंतर्गत ३० ते ४६ सफाई कामगार वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यात ३०० चाैरस फुटांची १२ हजार घरे बांधण्याचे महापालिकेने लक्ष्य ठेवले असून, २०२४-२५साठी ८५२ काेटी रुपयांची तरतूद केली आहे.
स्वच्छ, सुसज्ज आणि सुरक्षित निवास उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे प्रमुख ध्येय आहे. अनेक वर्षांपासून शहराच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या कामगारांना सन्मानाचे छप्पर मिळणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ५,५९२ कामगारांना घरे मिळालेली आहेत. उर्वरित घरांच्या बांधकामास पुढील तीन वर्षांत गती देण्यात येणार आहे. नव्या वसाहतींमध्ये पिण्याचे पाणी, मलनिस्सारण व्यवस्था, आरोग्य केंद्र, शाळा तसेच हरित क्षेत्र यांसारख्या सुविधा असतील. चिरागनगर, एस. आम्रपाली बिल्डिंग, कुर्ला लायन्स गार्डन या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. आश्रय योजना ही केवळ निवास योजना नाही, तर कामगारांच्या सन्मानासाठीची जबाबदारी आहे. बांधकामाच्या तांत्रिक अडचणी दूर करून २०२८ पर्यंत सर्व घरे पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
........
योजनेचा आराखडा
वर्ष : घरांची उपलब्धता
३१ डिसेंबर २०२५ ५१२ घरे
३० जून २०२६ ३,५०० घरे
३० जून २०२७ ८,००० घरे
३० जून २०२८ १२,००० घरे
......
एनओसीमुळे रखडपट्टी
‘महापालिकेच्या आश्रय योजनेचा लाभ सर्वच सफाई कामगारांना मिळायला हवा. काही प्रकल्प सुरू असूनही अनेकांना घर मिळालेले नाही. योजना कागदावर वेगात असली तरी प्रत्यक्षात ती मंद गतीने सुरू आहे,’ असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. काही प्रकल्पांना राज्य सरकारकडून एनओसी मिळण्यात झालेला विलंब ही एक मोठी अडचण ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.