मुंबई

तापमान वाढीची मुंबईकरांना चिंता

CD

तापमानवाढीची मुंबईकरांना चिंता

मुंबई, ता. १९ : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम आहे. शहराचे कमाल तापमान रविवारी कुलाब्यात ३५.० अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझमध्ये ३५.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. आर्द्रता अनुक्रमे ६७ आणि ५७ टक्के इतकी होती. त्यामुळे दिवसभर उकाड्याची तीव्रता जाणवत राहिली.
मागच्या आठवड्यात तापमान ३७ अंशांवर गेले होते. त्याच्या तुलनेत रविवारी दोन अंशांनी घट झाली असली, तरी वातावरणातील उष्णता कमी झालेली नाही. हवामान विभागाने पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज वर्तविला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दशकांत मुंबईतील सरासरी वार्षिक तापमान सुमारे २.४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. यामुळे शहरात ‘हीट आयलंड इफेक्ट’ वाढत असून, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळचा उकाडा अधिक जाणवत आहे. तापमानातील ही वाढ पर्यावरणतज्ज्ञ आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Cyber Fraud : डेक्कन, कोथरूडमधील दोन महिलांची १५ लाखांची फसवणूक

Jain Boarding Scam : जैन बोर्डिंगच्या व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे आदेश; २८ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

Matru Vandana Yojana : ‘मातृ वंदना’ ठरली लाखो गर्भवतींसाठी संजीवनी; राज्‍यात १ हजार ८३८ कोटींचा निधी वितरित

AUS vs IND: रोहित शर्मा नितीश रेड्डीला वनडे पदार्पणाची कॅप देताना नेमकं काय म्हणाला होता? BCCI ने शेअर केलाय Video

SCROLL FOR NEXT