दिवाळी, छटपूजेनिमित्त विशेष रेल्वे गाड्या
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : दिवाळी आणि छटपूजेनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या २२ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि अमरावती येथून सुटणार आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.
मुंबई विभागातून एकूण पाच विशेष गाड्या सुटतील. ट्रेन क्रमांक ०१०३१ सीएसएमटी-बनारस विशेष सकाळी ७.३५ वाजता, ट्रेन क्रमांक ०१०४७ सीएसएमटी-दानापूर विशेष दुपारी ३ वाजता, ट्रेन क्रमांक ०१०७९ सीएसएमटी-गोरखपूर विशेष रात्री १०.३० वाजता, ०११४३ एलटीटी-दानापूर विशेष सकाळी १०.३० वाजता आणि ०१०५१ एलटीटी-बनारस विशेष दुपारी १२.१५ वाजता सुटेल. पुणे विभागातून पुणे, हडपसर, खडकी, दौंड आणि कोल्हापूर येथून १० विशेष गाड्या सुटतील. यात पुणे-गोरखपूर, पुणे-सांगानेर, पुणे-दानापूर, हडपसर-दानापूर, हडपसर-गाझीपूर सिटी, हडपसर-लातूर, खडकी-हजरत निजामुद्दीन, दौंड-कलबुर्गी (अनारक्षित), कोल्हापूर-कलबुर्गी आणि कोल्हापूर-सीएसएमटी विशेष गाड्यांचा समावेश आहे. सोलापूर विभागातून लातूर आणि कलबुर्गी येथून चार गाड्या सुटतील. लातूर-हडपसर, कलबुर्गी-बंगळुरू कँटोनमेंट, कलबुर्गी-दौंड अनारक्षित विशेष आणि कलबुर्गी-कोल्हापूर विशेष या गाड्या असतील. नागपूर विभागातून नागपूर-समस्तीपूर विशेष, भुसावळ विभागातून अमरावती-पुणे विशेष गाडी असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.