मुंबई

कामाठीपुराच्या पुनर्विकासाला गती

CD

कामाठीपुराच्या पुनर्विकासाला गती
आर्थिक निविदा सोमवारी खुल्या होणार


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाने काढलेल्या निविदेत दोन कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या आहेत. त्यानुसार आता सोमवारी (ता. २७) संबंधित कंपन्यांनी लावलेली आर्थिक बोली म्हाडाकडून उघडली जाणार आहे. त्यामध्ये संबंधित जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर आणि एएटीके कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांपैकी नेमके कोण पुनर्विकास करणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आर्थिक बोली उघडल्यानंतर याबाबत गृहनिर्माण विभागाची अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे.
कामाठीपुरा हा सुमारे ३४ एकर जागेवर वसला असून, तेथे ९४३ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या इमारतींचा खासगी विकसकाच्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार रहिवाशांना-भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार असून, ८०० जागामालकाला प्रति ५० चौरस मीटर जागेकरिता ५०० चौरस फुटांची एक सदनिका मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने बांधकाम आणि विकास संस्थेची (सी अँड डीए) नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्याला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर आणि एएटीके कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनी निविदा भरली होती. त्यानुसार म्हाडाने केलेल्या तांत्रिक तपासणीत दोन्ही कंपन्या पात्र ठरल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे या आर्थिक निविदांमध्ये कोण किती चौरस फुटांचे घर देणार, रहिवाशांना आणि म्हाडाला काय लाभ दिले जाणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यावरून विकसक निश्चित केला जाणार आहे.

रहिवाशांना वेध
म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार रहिवाशांना-भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार असून, ८०० जागामालकाला प्रति ५० चौरस मीटर जागेकरिता ५०० चौरस फुटांची एक सदनिका मिळणार आहे. त्याव्यतिरिक्त विकसक आणखी काय सवलती देणार याचे भाडेकरू, रहिवासी आणि मालकांना वेध लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT