मुंबई

‘डीआरपी’ला म्हाडाचा दणका

CD

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात असलेले कार्यालय म्हाडाने काढून घेतले आहे. वर्षभरापूर्वी डीआरपीने आपला काही अंशी कारभार किंग्ज सर्कल येथे स्थलांतरित केला आहे. तरीही त्यांच्याकडून म्हाडा मुख्यालयातील कार्यालय रिकामे केले जात नव्हते. तसेच भाडेही दिले जात नसून थकबाकीचा आकडा २५ कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे म्हाडाने डीआरपीच्या ताब्यात असलेले कार्यालय रिकामे करत काढून घेतले आहे.

गृहनिर्माण भवनाच्या पाचव्या मजल्यावर कक्ष क्र. ६१९ मध्ये सुमारे सात हजार चौरस फुटांच्या जागेत डीआरपीचे कार्यालय होते. त्यासाठी म्हाडाकडून दरमहा २६५ रुपये प्रति चौरस फूट दराने भाडे आकारले जात होते. त्यांच्याकडून म्हाडाला भाडे दिले जात नसल्याने वारंवार नोटीस पाठवूनही प्रतिसाद दिला जात नव्हता. त्याचबरोबर बहुतांश कार्यालय रिकामे असतानाही अधिकृतपणे रिक्त केले जात नव्हते. दुसरीकडे म्हाडाच्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपुऱ्या जागेत बसावे लागत असल्याने म्हाडाने डीआरपी कार्यालयाचा ताबा घेत रिकामे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

SCROLL FOR NEXT