

Sanjay Dina Patil seen angrily confronting journalists
esakal
Sanjay Dina Patil Threatens Journalists During Media Interaction : उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे वादग्रस्त वर्तन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुक्रवारी पत्रकारांना राजकीय प्रश्न विचारल्यावर त्यांनी शिवीगाळ करत धमकी दिली."तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा... तुम्ही उगाच xxx बोटं घालताय. परत आलात तर मारून पाठवेन," अशा अरेरावीच्या भाषेत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शिवीगाळ केली.