Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Mumbai Municipal Corporation officer : पन्हाळ्याची माऊली आडकूर हिने शारीरिक अडचणींवर मात करत मुंबई महापालिकेत अधिकारीपद मिळवले आहे. दोन्ही हात नसतानाही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने यशाचा नवा इतिहास रचला.
Inspirational success story panhala

Inspirational success story panhala

esakal

Updated on

Mauli Adkur Mumbai Municipal Officer : (उत्तम महाडीक) : काही कथा या केवळ यशाच्या नसतात, त्या संघर्ष, जिद्द आणि मानवी इच्छाशक्तीच्या विजयाच्या असतात. पन्हाळा तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने अशीच एक असामान्य कथा घडवून दाखवली आहे. जन्मतःच दोन्ही हात नसतानाही नियतीसमोर हार न मानता, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत माऊली बळवंत आडकूर हिने नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) सहायक कार्यकारी अधिकारी या प्रतिष्ठेच्या पदावर निवड मिळवून इतिहास रचला आहे. तिच्या या यशाने केवळ पन्हाळा किंवा कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा उर अभिमानाने भरून आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com