मुंबई

विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील शाळा सुरक्षित!

CD

विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील शाळा सुरक्षित!
मानके पूर्ण करण्यात आघाडीवर; बदलापूर घटनेनंतर उपाययोजना
मुंबई, ता. २७ ः बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नवीन उपाययोजना, त्याची मानके निश्चित केली होती. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये मुंबईतील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील मानके पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शाळांनी मोठी आघाडी घेतली असून, केवळ बोटावर मोजता येतील इतक्या शाळा यासाठी मागे असल्याची माहितीही विभागाच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.
२४ प्टेंबर २०२४ रोजी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी सर्व समावेशक सूचना जारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका शिक्षण विभागाने आपल्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी मोठी भूमिका बजावली. आतापर्यंत विभागाअंतर्गत येणाऱ्या शहर आणि उपनगरांतील शाळांपैकी ९९ टक्‍क्‍यांहून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्यासाठीची यंत्रणा कार्यरत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी या पोस्को ईबॉक्स व चिराग या ॲपसोबतच शाळांमध्ये तक्रार पेटी, शाळांमध्ये सखी सावित्री समितीचे गठण आणि शाळा व्यवस्थापन आणि शाळेतच समुपदेशनाची व्यवस्था करण्यातही या शाळांनी आघाडी घेतली आहे.
मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या उत्तर विभागातील सर्वच ५२७ शाळांमध्ये, दक्षिण विभगाातील ४१८ शाळांपैकी ४१० हून अधिक शाळांमध्ये आणि पश्चिम विभागातील ७८७ शाळांपैकी सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सीसीटीव्ही बसविण्याची ही प्रक्रिया जून महिन्यातच सुरू करण्यात आली होती. ती अत्यंत वेगाने करण्यात आली. उर्वरित उपाययोजना आणि सुरक्षेसाठी जी मानके ठरली होती, तीही बहुतांश शाळांनी पूर्ण केली असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

शाळांची आकडेवारी
मुंबईत सुरक्षेसंदर्भातील मानके पूर्ण करणाऱ्या शाळांमध्ये केपी पश्चिम वार्डमधील सर्व १५० शाळा, एच वाॅर्डमधील ११४, आर पश्चिममधील १२५, पी वॉर्डमधील १६६ शाळांनी १०० टक्के सुरक्षा मानके पूर्ण केली आहेत. तर केपी पूर्वमधील १२६ शाळांनी ९९ टक्के, तर आर पूर्व वाॅर्डमधील १०३ शाळांनी ९८ टक्के सुरक्षा मानके पूर्ण केली आहेत.

अशी होती मानके
शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सकाळी आणि दुपारी शाळा सुटण्याच्या दरम्यान अशी दोन वेळा हजेरी नोंदवणे आवश्यक होते. शाळांमध्ये चोहोबाजूंनी भिंती व मुख्य प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारावर सुरक्षा नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यात महापा‍लिका शाळा यापूर्वीच आघाडीवर आहेत. मात्र अजूनही अनुदानित शाळांमध्ये यासंदर्भातील मोठ्या उणिवा राहिलेल्या आहेत.

अनुदानित शाळा मागे
सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही, तक्रार पेटी तसेच शाळांमध्ये सखी सावित्री समितीचे गठण झाले असले तरी विविध कारणे समोर करून अनुदानित शाळांनी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मानके अजूनही अपूर्ण असल्याचेही सांगण्यात आले.

अशा होत्या सूचना
प्रत्येक शाळेत दर्शनी भागात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दलची माहिती व त्यासाठीचे डिजिटल डिस्प्ले फलक प्रदर्शित करावे. शाळेच्या कोणत्याही परिसरामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घेणे. विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार, त्याच्या तक्रारी या पोस्को ईबॉक्स व चिराग या ॲपवर करणे आणि इतर उपाययोजना करणे आदींचा समावेश आहे. यासोबतच शाळा व्यवस्थापन आणि शाळेतच समुपदेशनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT