नागरिकांनी गिरवले पक्षाघात व्यवस्थापनाचे धडे
फ्लॅश मॉबच्या माध्यमातून जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : परळच्या ग्लेनईगल्स रुग्णालय आणि फिनिक्स पॅलेडियम यांच्या संयुक्त विद्यमाने मॉल परिसरात नागरिकांमध्ये पक्षाघाताबाबत जनजागृती करण्यात आली. दिवसातील तीन विविध सत्रांत फ्लॅश मॉबच्या माध्यमातून नाट्यमय सादरीकरण करण्यात आले.
पक्षाघात कसा होतो, त्यानंतरचा प्रत्येक मिनिट किती महत्त्वाचा ठरतो हे या ठिकाणी दाखवण्यात आले. उपस्थित नागरिकांना पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यास शिक्षित करण्यात आले. चेहरा एका बाजूस झुकणे, हातपाय लुळे पडणे, बोलताना अडखळणे, दृष्टीसंबंधी समस्या उद्भवणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत मॉलच्या आवारात सहा फूट घड्याळाची स्थापना करण्यात आली, जे गोल्डन अवरचे प्रतीक ठरत आहे. डिजिटल काउंटडाउनसह डिझाइन केलेले हे घड्याळ पक्षाघात व्यवस्थापनात वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, याची जाणीव करून देते.
या ठिकाणी पक्षाघातावर मात करीत जगण्याची नवी संधी मिळालेल्या व्यक्तींनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रत्येक कलाकृती ही त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचे प्रतिबिंबि होते. पक्षाघाताचा झटका ते पुन्हा पूर्वपदावर आलेले आयुष्य या दरम्यानचा प्रवास या ठिकाणी मांडण्यात आला होता.
न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, डॉ. शिरीष हस्तक, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. कुशल भाटिया आणि डॉ. मयूर घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
प्रत्येक मिनिट महत्त्वाचा
ग्लेनईगल्स रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन चेवले सांगतात, की एखाद्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका हा कधीही, कुठेही येऊ शकतो. मात्र गोल्डन अवरमध्ये उपचार केल्यास एखाद्याचे आयुष्य वाचू शकते. या मोहिमेद्वारे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मेंदूच्या आरोग्याबाबतीत प्रत्येक मिनिट किती महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.