मुंबई

वाटाघाटींदरम्यान आर्या प्रचंड अस्वस्थ!

CD

वाटाघाटींदरम्यान आर्या प्रचंड अस्वस्थ!

मुंबई, ता. ३१ : पवई ओलीसनाट्यातील आरोपी रोहित आर्या याच्यासोबत मुंबई पोलिसांनी सुमारे दोन तास वाटाघाटी करून मुलांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्या वाटाघाटीदरम्यान ताे प्रचंड अस्वस्थ हाेता. या चर्चेदरम्यान आर्याने माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी एकदाच बोलायचे असल्याचे सांगितले. त्याची नेमकी मागणी त्याने अखेरपर्यंत उघड केली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

फोनद्वारे या वाटाघाटी सुरू होत्या. दोन मिनिटे बोलल्यावर फोन कट करून आर्या आत जात असे. त्याला तळमजल्यावर असलेले राेहन अहेर मुलांना सोडविण्याचा प्रयत्न करतील, पोलिस स्टुडिओत शिरतील याची कायम भीती हाेती. त्याने ही भीती वाटाघाटींदरम्यान बोलूनही दाखवली हाेती.
लहान मुले एका क्षणानंतर कंटाळली. त्यांनी चुळबूळ, गोंगाट करण्यास सुरुवात केली. त्यामुळेही आर्या व्यथित होत होता. मुलांना गप्प करण्यासाठीही आर्या चर्चा अर्धवट सोडून सारखा त्या खोलीकडे जात असे. त्या खोलीत जाताच सर्व मुले घाबरून किंचाळत, असा अनुभव या अधिकाऱ्याने सांगितला.

------
आर्याला पकडून मुलांच्या सुटकेसाठी पथक घुसले
वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी स्टुडिओत शिरून आर्याला निरुत्तर करून किंवा ताब्यात घेऊन मुलांच्या सुटका करावी, अशी योजना आखून पोलिस पथक आत शिरले हाेते; मात्र आत शिरताच आर्याने बंदूक रोखली. तत्पूर्वी, त्याने जारी केलेल्या व्हिडिओत स्टुडिओला आग लावेन, अशी धमकी दिली होती. त्यामुळे मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वेळी जी योग्य वाटली ती कृती पोलिस पथकाने केली, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांना असा पोहाेचवला संदेश
आर्याने धमकीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दोन परिचित व्यक्तींना पाठवला आणि तो पोलिसांना दाखविण्यास सांगितले. तो पाहून पुढल्या पाच मिनिटांत पवई पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT