मुंबई

बाबुलनाथ  मंदिराची ‘ती’ जागा रिकामी करा

CD

बाबुलनाथ  मंदिराची
‘ती’ जागा रिकामी करा

 उच्च न्यायालयाकडून आधीचे आदेश कायम

सकाळ  वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ ः प्रसिद्ध  बाबुलनाथ  मंदिराच्या  पायऱ्यांवरील  जागा  याचिकादारांना  रिकामी करण्याचे आदेश  नुकतेच  उच्च  न्यायालयाने  दिले. ही जागा मुंबई भाडे कायद्याच्या  व्याख्येत  बसणारी  नसल्याचे कनिष्ठ  न्यायालयाने  दिलेला निर्णय  न्यायालयाने कायम ठेवला.

मंदिराच्या मुख्य  पायऱ्यांच्या  मध्यभागी असलेला हा भाग मंदिरात  भाविकांसाठी  वापरला जाणारा एक मोकळा मार्ग आहे. तो  याचिकादारांची  भाड्याची जागा म्हणता येणार नाही, असे निरीक्षण  न्या. मिलिंद  साठ्ये  यांच्या  एकलपीठाने  याचिकादारांना  दिलासा नाकारताना नोंदवले. तसेच पुराव्यांचा विचार करता  प्रथमदर्शनी  ही जागा एक खोली किंवा  याचिकादारांंची  वैयक्तिक भाड्याची जागा म्हणता येणार नाही. मुळात ही जागा मुंबई भाडे कायद्याच्या  कलम  ‘१५अ’अंतर्गत खोली म्हणता येणार नाही. ही जागा भक्तांसाठी मंदिरात जाण्यासाठी बांधलेल्या जिन्याचा भाग असल्याचेही  न्यायालयाने  कनिष्ठ  न्यायालयाचे  आदेश कायम ठेवताना नमूद केले.  याचिकादारांना  येत्या  सहा आठवड्यांत जागा रिकामी करून मंदिर व्यवस्थापनाला  हस्तांतरित  करण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण?
हा वाद १९७७ पासून सुरू असून, बाबुलनाथ  मंदिर व्यवस्थापनाने बाबा  ब्रह्मानंदजी  यांच्याविरुद्ध  खटला दाखल केला  होता. त्यांचे गुरू १९६८मध्ये  रामगिरीजींच्या  मृत्यूनंतर  बाबुलनाथ  मंदिर प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्यांचे शिष्य  धर्मगिरी  ब्रह्मानंदजींनी  जागेचा ताबा सोडला नाही.  त्याविरोधात  कनिष्ठ  न्यायालयाने  धर्मगिरी  महाराज  यांच्याविरोधात  आदेश दिला. त्या आदेशाला  धर्मगिरी  महाराज यांनी उच्च  न्यायालयात  आव्हान दिले होते.
----
बंदिस्त खाेली नव्‍हे, प्रवेश मार्ग!
ही जागा बंदिस्त खोली नसून मंदिरात प्रवेशाचा मार्ग आहे, म्हणूनच ताे साेडता येणार नाही, असा दावा मंदिर प्रशासनाने केला. दुसरीकडे, भाडेकरू  हक्क गुरूंच्या नावे करण्यात आला होता आणि वीज शुल्कदेखील भरत असल्याचा दावा धर्मगिरी  यांनी कायदेशीर वारस म्हणून खटला चालविताना  न्यायालयाला  सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या  भाडेकरू  हक्क  पावत्यांची बाब स्पष्टपणे सिद्ध होत असल्याचा युक्तिवादही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT