मुंबई

न्याय मिळेपर्यंत आंदाेलन!

CD

संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण - किकर

न्याय मिळेपर्यंत आंदाेलन!

युवक काॅँग्रेसचा इशारा; वर्षा बंगल्यावर धडक

मुंबई, ता. १० : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने आज मुंबईत आंदोलन केले. डाॅ. मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदाेलन सुरू राहील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. गिरगाव चाैपाटीवरून निघालेल्या माेर्चाने मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर धडक दिली. या वेळी कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली.

आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई अध्यक्षा झीनत शबरीन आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. संपदा मुंडे यांचा छळ झाल्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली; मात्र सरकारने मुख्य आरोपीला आधीच क्लीन चिट दिली आहे, असा युवक काँग्रेसने आरोप केला. त्याच वेळी जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
---
अर्धा तास ‘रास्ता राेकाे’
गिरगाव चौपाटीवरून निघालेल्या मोर्चाला नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राइव्हदरम्यान पाेलिसांनी राेखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अडथळे उभारण्यात आले हाेते, तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ ‘रास्ता रोको’ करून अर्धा तास वाहतूक राेखून धरली. अखेर पोलिसांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रस्ता माेकळा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, तणाव वाढला!

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT