मुंबई

चेंबूरमधील इमारतीला आग

CD

चेंबूरमधील इमारतीला आग

मुंबई, ता. १० : चेंबूर येथील सायन-ट्रॉम्बे मार्गावरील थॉमस कुक कॉर्पोरेट पार्क या इमारतीत सोमवारी (ता. १०) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. ही आग सुरुवातीला लेव्हल-१ होती; परंतु काही वेळातच अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-२ची घोषित केली. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील २००० चौरस फूट क्षेत्रात पसरली होती. विद्युत वायरिंग फर्निचर, रेकॉर्डस्‌, यू.पी.एस. बॅटरी आणि लाकडी दरवाजे या आगीत खाक झाल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाने सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. या आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

तो ऑडिओ हटवा नाहीतर... ते संभाषण लीक झाल्याने संतापली रश्मिका मंदाना; कारवाई करणार, नेमकं प्रकरण काय?

Indian Tourists : घर हलल्यासारखे झाले अन् आमची झोप उडाली, दुबईतील आँखो देखा हाल; क्षेपणास्त्र पडत होती....

Madha News : माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी पंडित देशमुख; उपसभापतीपदी स्वाती गिड्डे यांची बिनविरोध निवड

"संजूने तुझी जागा घेतली म्हणून..."; Shubman Gill ने मुद्दाम टीम इंडियाच्या फोटोतून संजूला क्रॉप केल? नेटिझन्सकडून आरोप, एकाने तर...

SCROLL FOR NEXT