मुंबई

मुंबईसह राज्यात पोलिस सतर्क

CD

मुंबईसह राज्यात पोलिस सतर्क
प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
मुंबई, ता. १० ः दिल्ली येथील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्य पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीतील बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच आयुक्त देवेन भारती यांनी सर्व सहआयुक्तांची बैठक बोलावून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या बैठकीला सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, सहआयुक्त (प्रशासन) जय कुमार उपस्थित होते. बैठकीनंतर शहरातील संवेदनशील शासकीय, खासगी आस्थापना, प्रार्थनास्थळे, गर्दीची रेल्वेस्थानके, बाजारपेठा, मॉल आदी ठिकाणांवर बंदोबस्त वाढवण्यात आली. त्रिस्तरीय सागरी सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून झाडाझडती घेणे, प्रत्येक निवासी हॉटेलांची तपासणी केली जात आहे. त्यासोबत पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक, श्वान पथक, शीघ्र कृती दल आदी विशेष पथकांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT