मुंबई

जे.जे.रोबोटिक स्कोलियोसिस शस्रक्रिया यशस्वी

CD

जे.जे.त प्रथमच रोबोटिक स्कोलियोसिस शस्रक्रिया
दोन रुग्णांच्या मणक्यातील विकृतीवर उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे. जे. रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी आणि अस्थिरोग विभागाने रोबोटिक पद्धतीने स्कोलियोसिस शस्त्रक्रिया करत एका २४ वर्षीय मुलीची आणि १५ वर्षीय मुलाची मणक्यातील वेदनेतून सुटका केली. अशाप्रकारची शस्त्रक्रिया मुंबईत प्रथमच पार पडल्याने जे. जे.च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
धुळे येथील दिव्या सूर्यवंशी (वय २४) हिला जन्मतः मणक्यात विकृती होती, तर तेलंगणातील निजामाबाद येथील १५ वर्षीय रसूल शेख याला पाच वर्षांपासून वेदना सुरू होत्या. अनेक डॉक्टरांकडे त्यांनी उपचार घेतले, मात्र फरक पडत नव्हता. जे. जे. रुग्णालयात त्यांनी तपासणी केली असता, दोघांनाही गंभीर ‘कायफो-स्कोलियोसिस’ विकृतीचे निदान झाले. त्यावर डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून मणक्यातील वाकडेपणा अत्यंत अचूकतेने दुरुस्त केला. ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. वनोंन बेल्हो, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. नादिर शाह, अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुणाल मोहिल, न्यूरोसर्जरी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मजहर खान, प्रा. डॉ. संगीत गव्हाळे यांनी शस्त्रक्रिया पार पडली. मणक्यातील वाकडेपणा थांबवणे, तसेच तो मूळ स्वरूप सुधारणा आणण्याची शस्‍त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते; मात्र रोबोटिक प्रणालीमुळे ती अधिक सुरक्षित आणि परिणामकारक झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
----
स्कोलियोसिस म्हणजे काय?
पाठीच्या मणक्यात वाकडेपणा किंवा एका बाजूला कललेला असतो, त्यास स्कोलियोसिस म्हणतात. मणण्यात १० अंशांपेक्षा अधिक वाकडेपणा असल्यास ही विकृती गंभीर मानली जाते. ती आणखी वाढल्यास फुप्फुसांवर दाब येऊन श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT