मुंबई

कुर्ला-घाटकोपर जोडण्यासाठी नवा उड्डाणपूल!

CD

कुर्ला-घाटकोपर जोडण्यासाठी नवा उड्डाणपूल!
पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाय; १,६३५ कोटींचा प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : पूर्व उपनगरातील भीषण वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. कुर्ला आणि घाटकोपर यांना थेट जोडणाऱ्या ४.२४ किमी लांबीच्या नव्या उड्डाणपुलासाठी तब्बल १,६३५ कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या कामासाठी महापालिकेने शनिवारी अभियंता संस्थांकडून निविदा मागवल्या.
महापालिकेने हा उड्डाणपूल कुठून कुठपर्यंत असेल, याचा आराखडाही तयार केला आहे. उड्डाणपुलाची सुरुवात एल-वॉर्डमधील कल्‍पना टॉकीज, कुर्ला येथे होणार असून, शेवट घाटकोपर येथील पंखे शाह दर्गाह परिसरात होणार आहे. मुख्य रस्त्याची लांबी ३.९१ किमी असून, कुर्ला बाजूचा रॅम्प १४६ मीटर, तर घाटकोपर बाजूचा रॅम्प १८० मीटर लांब आहे. तीन अतिरिक्त चढ-उतार मार्गांची व्यवस्थादेखील करण्यात येणार असून, त्यांची एकत्रित लांबी ६९५ मीटर इतकी आहे.
स्टील गार्डर्स व आरसीसी डेक स्लॅबवर आधारित उड्डाणपूल, त्यावर एकूण चार लेन्स तयार करण्यात येणार असून, त्यांची रुंदी १६.५ मीटर असून, अंदाजित कामकाजाची मुदत सुमारे चार वर्षे इतकी आहे.
सध्या एलबीएस मार्गावरील कुर्ला-घाटकोपार यादरम्यान एजीएलआर जंक्शन, घाटकोपर रेल्वेस्थानक परिसर आणि संत नरसी मेहता रोड भागात प्रचंड वाहतूक अडथळे निर्माण होत असतात. नवीन उड्डाणपुलामुळे हे जंक्शन्स पूर्णपणे बायपास करता येणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, एलबीएस मार्गावरील तणावग्रस्त वाहतूक सुटसुटीत होण्यास मदत मिळणार आहे.
महापालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मागील १० वर्षांत अशाच प्रकारच्या तांत्रिक प्रकल्पांचा अनुभव असलेल्या संस्था अर्ज करू शकतात. मोठ्या प्रमाणातील काम लक्षात घेता जॉइंट व्हेंचरला परवानगी देण्यात आली आहे.
कंत्राटदाराला उड्डाणपुलाबरोबरच ड्रेनेज, रोड फर्निचर, नॉइज बॅरिअर्स, शीट पाइलिंग, सिग्नेज यांसारखी जोड कामेही करावी लागणार आहेत. महापालिकेचा हा प्रकल्प अमलात आल्‍यानंतर पूर्व उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी होईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
* स्टील गर्डर्स व आरसीसी डेक स्लॅबवर आधारित उड्डाणपूल
* एकूण ४ लेन, रुंदी १६.५ मीटर
* अंदाजित कामकाजाची मुदत : सुमारे ४ वर्षे

कुठून कुठपर्यंत असेल उड्डाणपूल?
* उड्डाणपुलाची सुरुवात एल-वॉर्डमधील कल्‍पना टॉकीज, कुर्ला येथे होणार
* शेवट घाटकोपर येथील पंखे शाह दर्गाह परिसरात होणार
* मुख्य रस्त्याची लांबी : ३.९२ किमी
* कुर्ला बाजूचा रॅम्प : १४६ मीटर
* घाटकोपर बाजूचा रॅम्प : १८० मीटर
* तीन अतिरिक्त चढ-उतार मार्गांची एकत्रित लांबी : ६९५ मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

SCROLL FOR NEXT