‘हबीब मॅन्शन’च्या पुनर्विकासाला ब्रेक
दुर्घटनेनंतर परवानग्या सादर करण्याचे महापालिकेचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : भायखळ्याच्या हबीब मॅन्शनच्या पुनर्विकास प्रकल्पावर बेकायदा खोदकाम आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत महापालिकेने हे काम शनिवारी (ता. १५) रात्री तातडीने बंद करण्याचा आदेश जारी केला. महापालिकेने विकसक इब्राहिम जुसाब सोपारीवाला यांना २४ तासांत सर्व संबंधित परवानग्या सादर करण्याचे आदेश दिले असून, तसे न केल्यास आतापर्यंत झालेले बांधकाम स्वतःच्या खर्चाने पाडावे लागेल, असा इशारा दिला आहे.
विकसकाने पायाभरणीच्या कामासाठी करण्यात आलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात जॅकहॅमरने काम सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक सैल मातीचा व दगडांचा ढिगारा कोसळला. काही क्षणांतच त्याखाली मजूर गाडले गेले. उर्वरित कामगारांनी जीव ओतून बचावकार्य केले, मात्र यामध्ये राहुल (वय ३०) आणि राजू (वय २८) या मजुरांचा मृत्यू झाला. या वेळी तिघांचा वाचवण्यात यश मिळाले असून, ते या घटनेत गंभीर जखमी झाले. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, काम पूर्णपणे परवानगीशिवाय आणि सुरक्षा उपायांशिवाय सुरू होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे दुर्घटनेनंतरही विकसकांनी अग्निशमन दलालाही तत्काळ कळवले नाही, हे नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. जखमींना थेट नायर रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, महापालिका अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.
विकसकाची हलगर्जी
हबीब मॅन्शन पुनर्विकासाच्या कामात सुरक्षा नियमांची पायमल्ली झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याची माहिती ई-वॉर्डचे सहाय्यक आयुक्त रोहित त्रिवेदी यांनी दिली. दुर्घटनेची माहिती मिळताच कामबंदी आदेश जारी करण्यात आला. या प्रकरणात २०२३मध्ये मिळालेल्या ना हरकत सूचनामधील अनेक अटींचे उल्लंघन करण्यात आले. खड्ड्यांत काम करण्यासाठी आवश्यक भिंतींचे बळकटीकरण, सपोर्ट स्ट्रक्चर, सुरक्षा जाळ्या यांचा या प्रकल्पात अभाव होता, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.