मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

CD

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे
मूळ गुन्ह्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील कलमांची जोड

मुंबई, ता. १७ : घाटकोपर हार्डिंग दुर्घटनेच्या गुन्ह्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलमे जोडल्याची माहिती सोमवारी (ता. १७) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

घाटकोपरच्या छेडानगर परिसरातील पेट्रोलपंपाजवळ उभारण्यात आलेले बेकायदेशीर, अवाढव्य होर्डिंग १३ मे २०२४ रोजी कोसळले. त्याखाली चिरडून १७ जणांचा मृत्यू झाला होता. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास करून होर्डिंग उभारणाऱ्या इगो मिडिया कंपनीच्या मालकासह पाच जणांना अटक केली. त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झाले होते. तपासादरम्यान तत्कालीन राज्य रेल्वे पोलिस आयुक्त केसर खालिद यांच्यावर संशय घ्यावा, असे पुरावे आणि माहिती पुढे आली. खालिद आयुक्त असताना या हार्डिंगना परवानगी देण्यात आली. मोबदला म्हणून इगो मिडिया कंपनीने ८२ लाख रुपये खालिद यांच्या पत्नीचा व्यावसायिक भागीदार अर्शद खान याच्याशी संबंधित बँक खात्यांवर वळते केले. ही माहिती पुढे आल्यानंतर शासनाने खालिद यांना हार्डिंग परवानगी प्रकरणात प्रशासकीय त्रुटी ठेवणे व अनियमितता, असा ठपका ठेवत निलंबित केले. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने त्यांचा जबाबही नोंदवला, मात्र त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले नव्हते.

कथित भ्रष्टाचाराचाही उचित तपास
विशेष तपास पथकाने शासनाला एक अहवाल पाठवून या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व तपास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे सोपवावा, अशी विनंती केली, मात्र मूळ प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेकडून कथित भ्रष्टाचाराचाही उचित तपास केला जाईल, असे उत्तर एसीबीने पाठवले. त्यानंतर विशेष तपास पथकाने मूळ गुन्ह्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे जोडून तपास सुरू केला आहे, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT