''केईएम''ला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य गौरव पुरस्कार’
योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणारे मुंबईतील सर्वोत्कृष्ट रुग्णालय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाला यंदाचा “वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे मुंबईतील सर्वोत्कृष्ट व यशस्वी अंमलबजावणी करणारे रुग्णालय म्हणून केईएमला हा बहुमान मिळाला आहे. या यशामागे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांची दूरदृष्टी आणि क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे विकास देशमुख यांनी विकसित केलेले ‘एंड टू एंड क्लेम मॅनेजमेंट मॉडेल’ हे खरे शिल्पकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१२ ते २०१७ या काळात मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सरकारी आरोग्य योजनांचे दावे भरले जाताना प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिकचे दावे नामंजूर झाले होते. यातून महानगरपालिकेला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले, तर गरीब रुग्णांना मोफत उपचारापासून वंचित राहावे लागले. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी २०१५ पासून पुढाकार घेतला. त्यांनी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे विकास देशमुख यांनी तयार केलेल्या ‘एंड टू एंड क्लेम मॅनेजमेंट’ या संकल्पनेवर विश्वास ठेवला. सलग चार वर्षे देशमुख हे मॉडेल महानगरपालिका अधिकाऱ्यांना समजावून सांगत होते; पण त्यावेळी त्याची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर, मंत्री शेलार यांनी उपायुक्त,आयुक्त यांच्यासोबत स्वतः बैठक घेऊन देशमुख यांना सादरीकरण करण्याची संधी मिळवून दिली. अखेर २०१६ मध्ये पहिली निविदा काढली गेली.
१ जानेवारी २०१८ पासून क्रिएटिव्ह सोल्युशन्सने मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये हे मॉडेल राबवायला सुरुवात केली. परिणामी सर्व रुग्णालयांमध्ये १०० टक्के रुग्ण कव्हरेज, दरवर्षी सरासरी ८४ कोटी रुपयांचे दावे यशस्वीपणे सेटल झाले. २०१८ ते २०२५ या काळात महानगरपालिकेला दुप्पट महसूल प्राप्त झाला. एकही रुग्ण, नातेवाईक किंवा अधिकाऱ्याकडून कंपनीविरोधात तक्रार आली नाही.
मंत्री आशीष शेलार यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे आणि विकास देशमुख यांच्या क्रिएटिव्ह सोल्युशन्सच्या परफॉर्मन्स आधारित मॉडेलमुळे आज मुंबईतील लाखो गरिबू रुग्णांना कोट्यवधी रुपयांचे मोफत उपचार मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.