मुंबई

मुक्कामी जाणाऱ्या एसटीचालक वाहकांना हूडहुडी

CD

मुक्कामी जाणाऱ्या एसटीचालक वाहकांना हुडहुडी
महामंडळाकडून चादरी मिळणार कधी?; मुंबईतील कर्मचाऱ्यांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : एसटी बससेवा देणाऱ्या चालक व वाहकाला रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी राहताना असुविधा होत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यातच एसटी महामंडळाकडून मुक्कामी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना थंडीत वूलन ब्लॅंकेट देण्यात येत होते, मात्र दोन वर्षांपासून चादर देणे बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना हुडहुडी भरत आहे. मुंबईतून ग्रामीण भागात जाणाऱ्या १७ पैकी अनेक गावात सोयी-सुविधांची वानवा आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढली असून, शेकोट्या पेटू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली, तर पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्य परिवहन महामंडळ आजही अहोरात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत आहेत. यासाठी चालक, वाहक हे इमाने-इतबारे काम करतात. एसटी बस ही गावागावात शेवटच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडण्याची सुविधा देत असते. चालक व वाहक हे खेडेगावात शेवटची बस घेऊन जाऊन त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करत असतात.
शेवटच्या स्थानकावर रात्रीच्या वस्तीला गेलेल्या चालक व वाहकाला वस्तीच्या ठिकाणी बस सोडून दुसरीकडे जाऊन आराम करण्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे चालक व वाहकाला एसटीमध्ये आराम करावा लागतो. एसटी बसमध्ये झोपत असले तरी मच्छरांचा त्रास, थंडी वाजते. अशा परिस्‍थितीत चालक, वाहक यांना रात्र काढावी लागते. स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर जावे लागते. अंघोळीची सोय नसते. त्यामुळे कर्मचाऱ्याला ड्युटी संपेपर्यंत तसेच काम करावे लागते.
रात्री वस्‍तीला असलेल्‍या गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने चालक-वाहकांची राहण्याची सोय करणे गरजेचे असते, पण त्याकडे दुर्लक्ष होत असून, या असुविधेकडे एसटी प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

मुंबई विभागातील आगार आणि मुक्कामी गाड्या
मुंबई सेंट्रल -
१) वेळास
२) जमखंडी
परळ -
१) जांभूत
२) खरसुंडी
३) बेल्हे
४) लहुलसा

कुर्ला -
१) भीमाशंकर
२) घोडेगाव
३) म्हसवड

पनवेल -
१) केळवणे
२) आवरा
३) आपटा
४) वडगाव
५) मालडुंगा

मुंबई विभागातील आगारांतून १७ गाड्या रात्रवस्तीसाठी जातात. यापैकी काही गावांत शौचालयाची सुविधा नाही. मच्छरांचा त्रास, पंख्याची व्यवस्‍था नसते. तसेच काही ठिकाणी तिकीट मशीनच्या चार्जिंगची व्यवस्था नसते. गेले काही दिवस थंडी वाढली आहे. एसटी महामंडळकडून कापड मिळाले नसल्याने स्वतःचे ब्लॅंकेट रोज सोबत ठेवावे लागते, असे एका एसटी कर्मचाऱ्याने सांगितले.

एसटी महामंडळाने तात्काळ वूलन ब्लॅंकेटची व्यवस्था करावी. अनेकदा कर्मचाऱ्यांना ते वेळेत मिळत नाही. उन्हाळ्यात चादर मिळाल्‍यास त्याचा कर्मचाऱ्यांना वापर करता येणार नाही.
- श्रीरंग बरगे,
सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

आमच्या मान्यताप्राप्त संघटनेसोबत झालेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना गणवेशाचे कापड, पावसाळ्यात गमबूट रेनकोट, छत्री व हिवाळ्यात चालक-वाहकांना वूलन ब्लॅंकेट देणे व कार्यशाळा कर्मचाऱ्यांना गरम जर्सी देण्याची तरतूद आहे. आता सर्वत्र थंडी वाढत असल्‍याने तातडीने वूलन ब्लॅंकेट व जर्सीचे वाटप करण्यात यावे.
- संदीप शिंदे
- अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

मुंबई विभागातील पाच आगारांमध्ये जुलैमध्ये चादरींचे वाटप करण्यात आले आहे. ४० ते ५० एसटी कर्मचारी त्या वेळी अनुपस्थित होते. काही जणांनी स्टोररूममध्ये जाऊन चादरी घेतल्‍या आहेत.
- अभिजित पाटील,
विभाग नियंत्रक, मुंबई विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

Google Name Facts: गुगलच्या नावात आहेत तब्बल 10 “O”! जाणून घ्या यामागचा खरा अर्थ

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

SCROLL FOR NEXT