मुंबई

सीबीएसई मान्यतेसाठी ७५ लाखांचा अपहार

CD

सीबीएसई मान्यतेसाठी
७५ लाखांचा अपहार

माहीमच्या शाळेतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबई, ता. २० : माहीम येथील नामांकित शैक्षणिक संस्थेला ‘सीबीएसई’ मंडळाची संलग्नता मिळवून देण्यासाठी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपात विश्वस्त, सचिव, सदस्यांविरोधात बुधवारी (ता. १९) गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यात खासगी संस्थाचालक आणि तथाकथित एजंट महिलेसही आरोपी करण्यात आल्याचे माहीम पोलिसांनी सांगितले.

संस्थेच्या तत्कालीन उपाध्यक्षाने केलेल्या तक्रारीनुसार माहीम पोलिसांनी महिलेसह संबंधित शिक्षण संस्थेच्या चार आजी-माजी पदाधिकाऱ्यांविरोधात सामाईक हेतूने फसवणूक आणि फौजदारीपात्र विश्वासघात या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
संस्थेने काही वर्षांपूर्वी पहिली ते आठवी इयत्तेसाठी सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केला; मात्र नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमासाठी सीबीएसईची मान्यता आवश्यक असते. त्यासाठी तत्कालीन विश्वस्त, पदाधिकाऱ्यांनी सीबीएसईकडे अर्ज केला; मात्र ताे अमान्य होण्याच्या शक्यतेने संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने आरोपी महिलेची माहिती दिली. त्यानंतर या संस्थेने टप्प्याटप्प्याने संस्थेकडे ७५ लाख रुपये मागितले. त्यानंतर संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही रक्कम परस्पर या महिलेस दिली. त्यानंतरही सीबीएसईने हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर या महिलेने काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने संस्थेची फसवणूक झाल्याचे उघड झाले, असे पाेलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT