मुंबई

दावे पुराव्यांच्या आधारेच!

CD

दिशा सालियन मृत्यू प्रकरण

दावे पुराव्यांच्या आधारेच!
मुंबई, ता. २० : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल दंडाधिकाऱ्यांकडे का सादर केला नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २०) राज्य सरकारला केला. दुसरीकडे दिशाच्या मृत्यूच्या तपासाबाबत यापूर्वी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे चौकशीदम्यान उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे दाखल केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठापुढे सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सरकारी वकिलांकडे हा प्रश्न उपस्थित केला.

दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झाले नसल्याचा दावा पोलिसांनी आधीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल केले. मालवणी पोलिसांचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांच्या जागी आपली वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आणि आपण एसआयटीचा भाग झालो. त्याच अधिकारात जुलैमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा नगरकर यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Earthquake : इराणवर आता नैसर्गिक संकट ! अमेरिका अन् इस्त्रायलचे बॉम्बहल्ले सुरु असतानाच भूकंपाने देश हादरला

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT