मुंबई

शिवसेनेची जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा

CD

शिवसेनेची जिल्हा संपर्कप्रमुखांची घोषणा

‘स्थानिक’साठी आमदार-खासदार मैदानात उतरणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्हा संपर्कप्रमुखांची आज घोषणा केली. नगर पंचायत, नगर परिषदा आणि आगामी जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत भक्कमपणे लढण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुखपदी पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्कप्रमुखांनी जिल्ह्यातच थांबावे, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले असून राज्यातील ४० ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्कप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी किरण पावसकर आणि राजेश मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. रत्नागिरीसाठी यशवंत जाधव, रायगड ग्रामीणसाठी संजय घाडी, पालघरसाठी रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीण प्रकाश पाटील, पिंपरी-चिंचवड शहरासाठी सिद्धेश कदम, पुणे ग्रामीणसाठी खासदार श्रीरंग बारणे आणि राम रेपाळे, सातारा शरद कणसे, सांगली राजेश क्षीरसागर, कोल्हापूर खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक, सोलापूर संजय कदम, अहिल्यानगरमध्ये विजय चौघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
----
इतर विभागनिहाय जबाबदारी
उत्तर महाराष्‍ट्र
नाशिक लोकसभेसाठी राम रेपाळे, दिंडोरी लोकसभेसाठी राम रेपाळे यांच्यासह भाऊसाहेब चौधरी, जळगाव जिल्ह्यासाठी सुनील चौधरी, नंदुरबारसाठी राजेंद्र गावित, धुळ्याची जबाबदारी मंजुळा गावित.
---
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगरात महानगरचे संपर्कप्रमुख विलास पारकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी अर्जुन खोतकर, जालनासाठी अर्जुन खोतकर आणि भास्कर आंबेकर, बीडमध्ये टी. पी. मुंडे आणि मनोज शिंदे, धाराशिवसाठी राजन साळवी, नांदेडसाठी सिद्धराम म्हेत्रे, लातूरसाठी किशोर दराडे, परभणीमध्ये आनंद जाधव.

विदर्भ
बुलडाणामध्ये हेमंत पाटील, नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरसाठी दीपक सावंत तसेच गडचिरोलीसाठी दीपक सावंत यांच्यासह किरण पांडव, हिंगोलीमध्ये हेमंत पाटील, भंडारासाठी गोपीकिशन बाजोरिया, अमरावतीसाठी नरेंद्र भोंडेकर, वर्धासाठी राजेंद्र साप्ते, यवतमाळमध्ये हेमंत गोडसे, वाशिममध्ये जगदीश गुप्ता, अकोलामध्ये अभिजित अडसूळ, चंद्रपूर किरण पांडव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT